---Advertisement---

मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 1:02 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत धावांचा डोंगर उभारण्यात अपयश येत आहे. गेल्या काही सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवले होते. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता या संघातील वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने या संघाचा मजबूत पक्ष कुठला आहे, याचा खुलासा केला आहे.

ट्रेंट बोल्टने गुरुवारी (२२ एप्रिल ) दिलेल्या वर्चुअल मुलाखतीत म्हटले की, “मी हे नक्की सांगू शकतो की, मध्यक्रमातील फलंदाजांनी ज्याप्रकारे फलंदाजी केली आहे, त्या कामगिरीवर ते समाधानी नसतील. मला माहित आहे की, संघातील फलंदाज धावा करण्यासाठी उत्सुक आहेत. आमची सुरुवात चांगली झाली नाही. आम्हाला आणखी जास्त धावा करायला आवडतील. आमच्या संघाची ताकद ही शेवटपर्यंत लढणे हीच आहे. आमचे गोलंदाज हे करण्यात सक्षम आहेत. आता आमचा पुढील सामना पंजाब संघासोबत आहे. हा सामना रोमांचक व्हायला हवा. मी आशा करतो की, यावेळी आम्हाला जास्त धावा करण्यात यश येईल.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “न्यूझीलंडमध्ये आम्हाला दव पाहायची सवय नसते. इथे खूप दव पडते त्यामुळे हे मोठे आव्हान आहे. परंतु, हा देखील खेळाचा एक भाग आहे. या आव्हानाचा स्वीकार करावाच लागेल. मला चेंडूला स्विंग करायचा आहे. परंतु, असे करण्यास मी असमर्थ ठरत आहे. कारण इथे परिस्थिती आणि खेळपट्टी वेगळी आहे. परंतु जगातील या देशाचे हेच सौंदर्य आहे. हे एक मोठे आव्हान आहे, जे स्वीकारून तुम्हाला त्या परिस्थितीशी जोडून घ्यावे लागेल. मी हे आव्हान स्वीकारले आहे. जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करून मला आनंद होत आहे.”

मुंबईचा १४ व्या आयपीएल हंगामातील पाचवा सामना २३ एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वा रे भावा! शतक ठोकताच २० वर्षीय पडीक्कलने मिळवले ‘या’ खास विक्रमाच्या यादीत तिसरे स्थान

एकदम सॉलिड! कोहली-पडीक्कल जोडीची ‘या’ खास यादीत एंट्री

भारीच की! आयपीएलमध्ये मुंबई, चेन्नई सारख्या संघांनाही जो विक्रम करणे जमले नाही तो बेंगलोरने करुन दाखवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---