इंडियन प्रीमीयर लीगमध्ये अनेक खेळाडू आत्तापर्यंत खेळले आहेत. त्यातील काही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकले पण काही असे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळले ज्यांनी केवळ एका हंगामात चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्यानंतर त्यांची कामगिरी म्हणावी तशी झाली नसल्याने ते अचानक गायब झाले.
असेच काही खेळाडू आत्ता सध्या काय करतात त्याचा आढावा –
पॉल वॉल्थटी – २०११ च्या आयपीएल मोसमात वॉल्थटीला किंग्स इलेव्हन पंजाबचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातांनी पकडत फलंदाजीत कमाल केली. त्याने या मोसमात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १८९ धावांचा पाठलाग करताना ६३ चेंडूत १२० धावांची खेळी केली. याच मोसमात त्याने आशाच काही आक्रमक खेळी केल्या.
त्यामुळे जेव्हा हा मोसम संपला तेव्हा तो सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मात्र यानंतर त्याचा फॉर्मही हरवला त्यामुळे त्याला जास्त संधी मिळाली नाही. सध्या वॉल्थटी एअर इंडियामध्ये काम करत असून त्यांच्याकडून क्रिकेटही खेळतो.
स्वप्निल आस्नोडकर – मुळचा गोव्याचा असणारा स्वप्निलने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शानदार खेळ केला. त्याने आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या १० चौकारांचा आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याने त्या मोसमात राजस्थानकडून ८ सामन्यात ३११ धावा केल्या. त्याच्या पुढच्या मोसमातही राजस्थानने त्याला संघात कायम केले.
मात्र २०११ च्या नंतर त्याला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले. त्याने त्याआधी २००७-०८च्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. पण त्याला कधीही भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो शेवटचे गोव्याकडून २०१८मध्ये खेळला. त्यानंतर तो क्रिकेट खेळलेला नाही.
मनप्रीत गोनी – भारताचा वेगवान गोलंदाज मनप्रीत गोणीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण 44 सामन्यात 37 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने सुरुवातीला आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना २००८ च्या आयपीएलमध्ये १६ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला भारताकडूनही खेळण्याची संधी मिळाली. त्याच्या या कामगिरीमुळे तो पुढचे दोन मोसमही चेन्नईकडून खेळला. पण त्यानंतर त्याचा फॉर्म खराब झाला. त्यामुळे त्याला संघातील जागा गमवावी लागली.
पण पुन्हा आयपीएलच्या ६ व्या मोसमात तो पंजाबकडून खेळला. पण २०१८च्या आयपीएल मोसमात तो अनसोल्ड राहिला. त्यानंतर त्याने मागीलवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आता जगभरातील विविध लीग स्पर्धांमध्ये खेळतो. नुकताच तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरिजमध्ये इंडिया लिजंट्स संघाचा भाग होता.
२००८मध्ये जेव्हा तो २४ वर्षांचा होता तेव्हा त्याने आपला मुलगा गमावला. पुढे त्याला त्याच वर्षी भारताकडून २ सामने खेळण्याची संधी मिळाली होती.२०१३मध्ये त्याच्या आईने त्यावर जिंवत मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. संपत्तीवरुन हा वाद झाला असल्याचे वृत्त तेव्हा आले होते.
राहुल शर्मा – पुणे वॉरियर्स संघाकडून २०११ च्या आयपीएलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाद करत राहुल शर्माने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याच्या विकेट्स घेण्याच्या क्षमतेमुळे त्याला भारतीय संघातही स्थान मिळाले. पण त्याची कामगिरी खालवत गेल्याने त्याला वगळण्यातही आले.
तसेच त्याला २०१५ ला चेन्नई सुपर किंग्सने संघात घेतले पण त्याला एकही सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे २०१४ नंतर तो कोणतीही स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही.
ट्रेटिंग घडामोडी –
–रोहितसह हे ४ खेळाडू आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर बाद
–१२ पैकी १२ आयपीएलमध्ये सुरेश रैनाने धावांचा असा पाडला आहे पाऊस