सोमवारी (23 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर बाबरला चाहत्यांची चांगली चांगली दाद मिळाली. तसेच त्याने मैदानात केलेल्या एका गोष्टीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
बाबर आझम () याने पाकिस्तान संघासाठी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 92 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. बाबर आझमच्या या खेळीचे कौतुक होत आहेच. पण त्याने मैदानात अशी एक गौष्ट केली, ज्याचे त्याहून जास्त चर्चा आणि कौतुक होत आहे. अफगाणिस्तानचा अष्टपैलू दिग्गज मोहम्मद नबी लाईव्ह सामन्यात बाबरच्या शुजची लेस बांधण्यासाठी पुढे आला होता. मात्र बाबरने त्याला लेस बांधू दिली नाही. पाकिस्तानी कर्णधाराच्या या कृतीकडे नेटकरी वेगवेगळ्या पद्धतीने पाहत आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
दरम्यान, फळंदाज लाईव्ह सामन्यात खेळपट्टीवर असताना अनेकदा त्याच्या शुजची लेस सुटल्याचे पाहायला मिळते. अशा वेळी पायांना पॅड आणि हातात ग्लव्ज घातलेल्या फलंदाजाला ही लेस बांधण्यासाठी कसरत करावी लागते. याच कारणास्तव बहुतांश वेळा विरोधी संघाचे खेळाडू फलंदाजाच्या शुजची लेस बांधताना दिसतात. पण बाबरने मात्र, मोहम्मद नबीला असे करू दिले नाही. 29 वर्षीय बाबरला 38 वर्षीय नबी क्रिकेटच्या मैदानात नेहचमी वरिष्ठ खेळाडू राहिला आहे. आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठा असणाऱअया नबीच्या आदारामुळे बाबरने त्याला लेस बांधू दिली नाही, असे सांगितले जात आहे.
Babar Azam didn’t let Mohd Nabi tie his shoe lace. #AFGvPAK pic.twitter.com/d0DqifgxGy
— Vipin Tiwari (@Vipintiwari952_) October 23, 2023
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या सामन्यात पाकिस्तान संघ 7 विकेट्सच्या नुकसानावर 282 धावा करू शकला. बाबरव्यतिरिक्त सलामीवीर उब्दुल्लाह शफीक याने 75 चेंडूत 58 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. नूर अहमद याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर नवीन उल हक याने 2 विकेट्स घेतल्या. आझमतुल्लाह ओमरझाई आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (One thing that Babar Azam has done in a live match is getting him appreciation from fans)
महत्वाच्या बातम्या –
कोहलीच्या जबरदस्त खेळीने रैना खूश, सामन्यानंतर बोलला ‘ही’ मोठी गोष्ट
‘या’ तिघांसराखे क्रिकेटपटू पुन्हा होणारच नाहीत! माजी दिग्गजाकडून भारतीय फलंदाजाचे कौतुक