fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बरोबर वर्षांपुर्वी सीएसकेला धुळ चारत मुंबई इंडियन्स ठरली होती आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम

May 13, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

बरोबर १ वर्षांपूर्वी १२ मे २०१९ ला आयपीएलच्या १२ व्या मोसमाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात हैद्राबाद येथे पार पडला होता. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने १ धावेने विजय मिळला आणि चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद मिळवण्याचा इतिहास रचला. त्यावेळी ४ आयपीएल विजेतेपद जिंकणारा मुंबई इंडियन्स पहिला संघ ठरला.

त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ चौथे आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले होते. कारण त्या सामन्याआधी दोन्ही संघांनी प्रत्येकी ३ आयपीएल विजेतेपद मिळवले होते.

अखेर या सामन्यात मुंबई इंडियन्स यशस्वी ठरला आणि ते चौथ्या विजेतेपदासह आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ ठरले. विशेष म्हणजे मुंबईने ही चारही विजेतेपदं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मिळवली आहेत.

#VIVOIPL 2019 Champions 🏆 – @mipaltan 🔥 pic.twitter.com/XPl5dzh2H6

— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2019

या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. मुंबईकडून अष्टपैलू किरॉन पोलार्डने सर्वाधिक नाबाद ४१ धावा केल्या. तसेच कर्णधार रोहित शर्मा(१५) आणि क्विंटॉन डिकॉकने(२९) मुबंईला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यांनी ४५ धांवाची सलामी भागीदारी केली होती.

पण नंतर मुंबईचे फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. चेन्नईकडून दिपक चहरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला फाफ डू प्लेसिस आणि शेन वॉट्सनने चांगली सुरुवात दिली. डु प्लेसिसने चांगली सुरुवात करताना १३ चेंडूत २६ धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार मारला.

पण तो बाद झाल्यानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली. पण असे असले तरी एका बाजूने वॉट्सन खेळत होता. त्याने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले.

शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. तसेच त्यांच्याकडे ५ विकेट्स हातात होत्या. त्यावेळी रोहितने लसिथ मलिंगाकडे चेंडू सोपवला. यावेळी चेन्नईकडून वॉट्सन आणि जडेजा फलंदाजी करत होते. त्यांनी पहिल्या ३ चेंडूंवर ४ धावा काढल्या.

मात्र चौथ्या चेंडूवर वॉट्सन दुहेरी धावा धावताना नाट्यपूर्ण पद्धतीने धावबाद झाला. त्याने ५९ चेंडूत ८० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ षटकार मारले.

पण वॉट्सन बाद झाल्यानंतर चेन्नईसमोर २ चेंडू ४ धावा असे समीकरण होते. तसेच वॉट्सन बाद झाल्याने शार्दुल ठाकूर फलंदाजीसाठी आला होता. त्याने पाचव्या चेंडूवर जडेजासह २ धावा पळून काढल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना मलिंगाच्या यॉर्करवर तो पायचित झाला आणि मुंबई संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

विशेष म्हणजे १ धावेने अंतिम सामना जिंकण्याची मुंबई इंडियन्सची ही दुसरी वेळ होती. त्यांनी २०१७ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यातही रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्ध १ धावेने विजय मिळवला होता.

तसेच नमुद करण्यासारखी गोष्ट अशी की १२ व्या आयपीएल मोसमात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ अंतिम सामन्यासह ४ वेळा आमने सामने आले होते. या चारही सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

कोविड १९ पेशंटचे तापमान मोजायले जसे मशीन असते तसे क्रिकेटपटू खोटं बोलतात की नाही पहायला…

हॅट्रिक घेतली, ५६४ विकेट्स घेतल्या आणि शेवटी कोच झाल्यावर केली मॅच फिक्सिंग

१० वर्ष सुपर डुपर फ्लाॅप, संघाबाहेरही गेला… पण कमबॅक करत बनला देशातील सर्वात मोठा स्टार


Previous Post

कोविड १९ पेशंटचे तापमान मोजायला जसे मशीन असते तसे क्रिकेटपटू खोटं बोलतात की नाही पहायला…

Next Post

मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या देशातील संघाकडून खेळायला नकार देणारा खेळाडू

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@mipaltan and iplt20.com
IPL

रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’

April 10, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Next Post

मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या देशातील संघाकडून खेळायला नकार देणारा खेळाडू

आयसीसीच्या त्या एका ट्विटने सचिनला आली 'दादी'ची आठवण

दोन विश्वचषकात चांगली कामगिरी करुनही २०१४मध्ये माझ्या घरावर फेकले होते दगडं

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.