रविवारी(6 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पार पडला. या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताकडून हार्दिक पंड्या (42*) आणि श्रेयस अय्यर(12*) यांची जोडी नाबाद राहिली. याबरोबरच या सामन्यात श्रेयसच्या नावावर एक खास विक्रम नोंदवला गेला.
वाढदिवसाच्या दिवशी खेळला टी20 सामना
खरंतर रविवारी श्रेयसचा 26 वा वाढदिवस होता. त्याचा हा वाढदिवस आणखी खास ठरला. कारण त्याला वाढदिवसाच्या दिवशी भारताकडून खेळण्याची संधीही मिळाली आणि भारतीय संघाने विजय देखील मिळवला.
श्रेयसची वाढदिवसाच्या दिवशी भारताकडून टी20 सामन्यात फलंदाजी करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी त्याने मागीलवर्षी 25 व्या वाढदिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध हैदराबाद येथे टी20 सामन्यात फलंदाजी केली होती. मात्र त्या सामन्यात तो केवळ 4 धावांवर बाद झाला होता.
विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी 2 वेळा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात फलंदाजी करणारा श्रेयस दुसराच फलंदाज आहे(तीन्ही क्रिकेट प्रकारचा दर्जा असणाऱ्या संघांपैकी). याआधी असा कारनामा केवळ दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने केला आहे.
डिविलियर्सने 17 फेब्रुवारी 2012 ला वाढदिवशी न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे टी20 सामन्यात 8 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 5 वर्षांनी वाढदिवशीच म्हणजेच 17 फेब्रुवारी 2017 ला त्याने न्यूझीलंड विरुद्धच ऑकलंड येथे टी20 सामन्यात 26 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे पदार्पण ठरले खास; पहिल्याच सामन्यात विराट कोहलीला केले बाद
सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर दिसला हार्दिकचा ‘दिलदारपणा’, जिंकली चाहत्यांची मने
आयएसएल २०२०: ब्लास्टर्सला पराभूत करत गोव्याचा सफाईदार पहिला विजय; गुणतक्त्यात ‘या’ क्रमांकावर मुसंडी