वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. या विश्वचषकासाठी संघ निवडीची अंतिम तारीख 28 सप्टेंबर होती. अखेरच्या दिवशी भारत व ऑस्ट्रेलियाने आपापल्या संघामध्ये प्रत्येकी एक बदल करत आपला अंतिम संघ घोषित केला. भारताने जखमी अष्टपैलू अक्षर पटेल याच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विन याला संघात समाविष्ट केले. यासोबत अश्विन हा विराट कोहलीसह 2011 वनडे विश्वचषक जिंकलेल्या संघातील केवळ दुसरा खेळाडू म्हणून या विश्वचषकात सहभागी होईल.
श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे अक्षर पटेल या विश्वचषकातून बाहेर फेकला गेला. त्याचा पर्याय म्हणून संघ व्यवस्थापनाने मोठा अनुभव पाठीशी असलेल्या अश्विन याला संघात जागा दिली. अश्विनने नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून वनडे संघात पुनरागमन केले होते. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन बळी मिळवलेले.
या निवडीसह तो आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा वनडे विश्वचषक खेळेल. 2011 मध्ये त्याने प्रथम वनडे विश्वचषकात सहभाग घेतलेला. त्यावेळी भारतीय संघ विजेता ठरलेला. त्यानंतर 2015 विश्वचषकात देखील तो भारतीय संघाचा भाग राहिलेला. मागील विश्वचषकात जागा मिळवण्यात त्याला अपयश आलेले. आता विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनाच भारतासाठी दोन वेळा वनडे विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Only Ravichandran Ashwin And Virat Kohli Play 2011 And 2023 ODI World Cup For India)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री