Loading...

…म्हणून हैदराबाद टी२० सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंकडून सुटले झेल

शुक्रवारी (6 डिसेंबर) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद येथे भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंकडून अनेक झेल सुटले.

Loading...

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर फ्लडलाइट्स खाली असल्यामुळे झेल पकडण्यात अडचण आल्याचे भारताचा सलामीवीर केएल राहुलने म्हटले आहे. 

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात भारताचे क्षेत्ररक्षण निराशाजनक होते आणि भारतीय संघाने पाच झेल सोडले. वाॅशिंग्टन सुंदरने 54 धावांवर शिमरॉन हेटमायरचा झेल सोडला. यानंतर रोहित शर्माने कायरन पोलार्डचा झेल सोडला.

वेस्ट इंडिजच्या डावाच्या शेवटच्या षटकात कर्णधार विराट कोहलीने जेसन होल्डरचा झेल सोडला. तथापि, विंडीज संघाचे क्षेत्ररक्षण देखील कमकुवत होते.

Loading...

राहुल म्हणाला, “समस्या प्रकाशाची होती. बर्‍याच वेळा, प्रकाशामुळे झेल पकडताना चेंडूूवर नजर राहायची नाही, या सामन्यात बर्‍याच वेळा असे घडले. आम्ही यापूर्वी येथे खेळलो आणि वर्षानुवर्षे खेळत आहोत. आम्हाला काय हवे आहे हे आम्हाला माहित आहे आणि एक संघ म्हणून आम्ही अशा गोष्टींबद्दल तक्रार करत करू शकत नाही.

तो म्हणाला, “आम्हाला माहित आहे की फ्लडलाइट्सच्या प्रकाशात आम्ही सराव केला नाही. त्याच वेळी आम्हाला कल्पनाही होती की फ्लडलाइट खाली आहेत. पण असे असूनही, आम्ही प्रयत्न केले, परंतु बऱ्याच वेळा आपले लक्ष चेंडूवरून विचलित होते आणि चेंडू हातातून निसटतो.”

Loading...

 

You might also like
Loading...