---Advertisement---

नादच खुळा! शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप 5 फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय

Shubman-Gill
---Advertisement---

बुधवारी (दि. 09 ऑगस्ट) आयसीसी वनडे रँकिंग जाहीर झाली. या रँकिंगमध्ये भारतीय संघाचा स्टार युवा सलामावीर शुबमन गिल याला चांगला फायदा झाला आहे. शुबमन गिल वनडे क्रमवारीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. गिल फलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये अव्वल 5मध्ये सध्यातरी एकमेव भारतीय आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन सामन्यात फ्लॉप ठरला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने 85 धावांची वादळी खेळी साकारली होती. जर अव्वल 10 फलंदाजांच्या यादीवर नजर टाकली, तर यात विराट कोहली याचाही समावेश आहे.

फलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अव्वलस्थानी आहे. त्याचे 886 गुण आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रस्सी व्हॅन दर दुसेन आहे. त्याचे 777 गुण आहेत. तसेच, फखर जमान 755 गुणांसह तिसऱ्या, इमाम उल हक 745 गुणांसह चौथ्या आणि शुबमन गिल (Shubman Gill) 743 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तसेच, विराट कोहली (Virat Kohli) यादीत 9व्या स्थानी आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा अव्वल 10मध्ये सामील नाहीये. रोहित 693 गुणांसह 11व्या स्थानी आहे.

दुसरीकडे, गोलंदाजांच्या वनडे क्रमवारीविषयी बोलायचं झालं, तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याचे 670 गुण आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेजलवूड यादीत अव्वलस्थानी आहे. त्याचे 705 गुण आहेत. याव्यतिरिक्त 686 गुणांसह मिचेल स्टार्क दुसऱ्या, 682 गुणांसह राशिद खान तिसऱ्या आणि 622 गुणांसह भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव दहाव्या स्थानी आहे.

ईशान किशन यानेही क्रमवारीत उंच भरारी घेतली आहे. त्याला 9 स्थानांचा फायदा झाला आहे. ईशानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत सलग 3 अर्धशतके झळकावली होती. तो सध्या 36व्या क्रमांकावर आहे. ईशानचे 589  गुण आहेत. श्रेयस अय्यरला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. तो 31व्या स्थानी आहे. अय्यर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे.

खरं तर, भारतीय संघाने वनडे मालिका 2-1ने आपल्या नावावर केली होती. त्यानंतर आता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. मात्र, त्यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात संघाला सलग पराभवाचा सामना करावा लागला होता. (opener shubman gill moves to 5th in icc odi batting rankings india vs west indies series)

महत्त्वाच्या बातम्या-
कुलदीपचा भीमपराक्रम! 3 विकेट्स घेताच मोडून टाकला चहलचा ‘हा’ मोठा Record, लगेच वाचा
मालिका वाचवण्यात ‘या’ 3 भारतीय धुरंधरांनी लावली सगळी ताकद, एक गोलंदाजीत, तर दोघे फलंदाजीत चमकले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---