सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शनिवारी (०७ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ५४वा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने ३ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस याने मोठी खेळी केली. याउलट त्याचा सलामी जोडीदार विराट कोहली मात्र गोल्डन डक झाला. यानंतर एक अनोखा विक्रम झाला आहे.
बेंगलोरकडून (Royal Challengers Bangalore) सलामीला फलंदाजीला आलेले विराट (Virat Kohli) आणि डू प्लेसिस (Faf Du Plesis) यांची जोडी जास्त वेळ टिकू शकली नाही. डावातील पहिल्याच चेंडूवर हैदरबादचा गोलंदाज जगदीश सुचीथ याने केन विलियम्सनच्या हातून विराटला झेलबाद केले. परिणामी विराट एकही धाव न करता पव्हेलियनला परतला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मात्र विराट बाद झाल्यानंतरही डू प्लेसिसने एक बाजू धरून ठेवली. त्याने रजत पाटीदारसोबत १०५ धावांची प्रशंसनीय भागीदारी रचली. पाटीदार १३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पाटीदार ४८ धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच्यात आणि ग्लेन मॅक्सवेलमध्ये ५४ धावांची भागीदारी झाली. तसेच शेवटी दिनेश कार्तिकसोबत ३३ धावांची अभेद्य भागीदारी केली. अशाप्रकारे सलामीला फलंदाजीला येत डू प्लेसिसने शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला.
यादरम्यान डू प्लेसिसने वैयक्तिक नाबाद ७३ धावा फटकावल्या. ५० चेंडू खेळताना २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ही कर्णधार खेळी केली. आयपीएलमध्ये एक सलामी जोडीदार शून्य धावेवर बाद झाल्यानंतर दुसऱ्या सलामीवीराने अर्धशतक करण्याची ही दुसरीच वेळ होती. तब्बल १३ वर्षांनंतर आयपीएलमध्ये असे काही घडले आहे.
यापूर्वी २००९ साली डेक्कन चार्जर्सकडून ऍडम गिलख्रिस्टने आपला सलामी जोडीदार शून्यावर बाद झाल्यानंतर दिल्ली डेअरडेविल्सविरुद्ध ८५ धावा केल्या होत्या.
दरम्यान बेंगलोरच्या डावाबद्दल बोलायचे झाल्यास, विराटला वगळता बेंगलोरकडून सर्वांनी चांगल्या खेळी केल्या. डू प्लेसिसने नाबाद ७३ धावांचे योगदान दिले. पाटीदारनेही ३८ चेंडूंमध्ये ४८ धावा फटकावल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेलनेही ३३ धावा केल्या. डावाअंती दिनेश कार्तिकनेही ८ चेंडूंमध्ये ३० धावा जोडल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘उद्या परीक्षा आहे, एकतर गोल्डन डक हो किंवा शतक मार, नाहीतर…’, विराटने केली चाहतीची मागणी पूर्ण
‘कोणालाही कर्णधार बनवू, पण तुला नाही’, टीम इंडियाच्या कॅप्टन्सीबद्दल युवराज सिंगचा मोठा उलगडा
‘तो धड रनही बनवत नाहीये आणि विकेटही घेत नाहीये’, जडेजाच्या खराब फॉर्मबद्दल माजी दिग्गजाचे वक्तव्य