आयपील 2024 चा फायनल सामना कोलकात नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यामध्ये खेळला गेला. चेन्नईच्या चेपाॅकच्या स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात कोलकातानं 8 विकेट्सनं हैदराबादला नमवत ट्राॅफीवरती त्यांच नाव कोरलं. सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून केकेआरचं पारडं जड होत. केकेआरनं आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा ट्राॅफीवरती नावं कोरलं.
तत्पूर्वी आयपीएलमध्ये वैयक्तिक बक्षीसं दिले जातात. त्यामध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचा देखील समावेश आहे. या बक्षीसांमार्फत खेळाडूंचा सन्मान केला जातो. तसंच यंदाच्या हंगामात अनेक फलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीमार्फत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी बॅटमधून धावांचा पाऊस पाडला. तर अनेक गोलंदाजांनी चेंडूसह सर्वांना प्रभावित केलं.
ऑरेंज कॅप ही एका हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्याला दिली जाते. तर पर्पल कॅप सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते.
तसंच या आयपीएलच्या हंगामात ऑरेंज कॅपच्या यादीत आपल्याला बऱ्याच वेळा वरचढ होताना दिसली. परंतु आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली हा आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून ऑरेंज कॅपच्या यादीत शीर्ष स्थानी राहिला. विराटनं या हंगामात 15 सामन्यांमध्ये 154.69 स्ट्राईक रेटनं 741 धावा ठोकल्या. आणि आरेंज कॅपचा मानकरी ठरला. विराटनं आयपीएलच्या इतिहासात 2 वेळा ऑरेंज कॅप जिंकली. (2016, 2018).
तर आयपीएलच्या या हंगामातला पर्पल कॅप विजेता हर्षल पटेल ठरला. त्यानं या हंगामात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत पर्पल कॅपचा मान मिळवला. त्यानं 14 सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेत ऑरेंज कॅप मिळवली. या हंगामात त्यानं सर्वोत्तम गोलंदाजी केली. (2021, 2024) या दोन वर्षी तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
संघाचा लाजिरवाणा पराभव सहन झाला नाही, काव्या मारन चालू मॅच मध्येच स्टेडियममधून निघून गेली
केकेआरनं तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव! सनरायझर्स हैदराबादवर मिळवला ऐतिहासिक विजय
संपूर्ण आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम!