fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एमएसएलटीए नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत देशभरातून 150हुन अधिक खेळाडू सहभागी

पाचगणी: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत  देशभरातून 150हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. हि स्पर्धा पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे दि.20 ते 26 एप्रिल 2019 या कालावधीत रंगणार आहे. 
 
रवाईन हॉटेल यांच्या तर्फे गेली 11 वर्षे अनेक भव्य टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धादेखील याचाच एक भाग आहे. पाचगणी येथील सुंदर व्हॅलीच्या ठिकाणी असलेल्या रवाईन हॉटेलच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा होत आहे.हि स्पर्धा 16 वर्षाखालील मुले व मुली एकेरी व दुहेरी गटांत होणार आहे.
You might also like