पुणे। बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस 200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 200हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे 2 ते 8 मे 2022 या कालावधीत होणार आहे. शहरात 10 वर्षाच्या कालावधीनंतर वरिष्ठ आयटीएफ टेनिस स्पर्धेत आयोजन होत असून ही स्पर्धा एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत आहे. या स्पर्धेला आर्यन पम्प्स यांचे सहप्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेत देशभरातून 200 हुन खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा 35 वर्षांवरील, 40 वर्षांवरील, 45वर्षांवरील, 55वर्षांवरील, 60 वर्षांवरील, 65 वर्षांवरील, 70 वर्षांवरील पुरुष गटात, तर 35 व 45 वर्षावरील महिला गटात पार पडणार माहिती स्पर्धा संचालक सुंदर अय्यर आणि डीएस रामा राव यांनी दिली. स्पर्धेत नितीन कीर्तने, रवींद्र पांडे, आदित्य खन्ना, डॉ. दीपांकर चक्रवर्ती, योगेश शहा हे अव्वल भारतीय वरिष्ठ खेळाडू आपापल्या गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या एस400 स्पर्धेनंतर होणारी भारतात होणारी ही दुसरी उच्च दर्जाची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना आयटीएफ गुण मिळवण्याची व आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, या स्पर्धेत भारतातील अनेक अव्वल माजी टेनिसपटू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. आयटीएफ वरिष्ठ सर्किटला देशातुन मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून जानेवारी ते जून 2022 या कालावधीत 13 आयटीएफ जागतिक मानांकन टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये एस400, एस200 आणि एस100 स्पर्धांचा समावेश असणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.
या वरिष्ठ गटातील स्पर्धांमुळे देशातील टेनिसच्या प्रसारासाठी आणखी मदत मिळणार असून अनेक भागातील वरिष्ठ टेनिसपटूंना पुन्हा टेनिसकडे वळण्याची तसेच, व्यावसायिक टेनिसखेळाडूंना उच्च स्तरावरील स्पर्धा करण्याची आणि आपल्या खेळात व तंदरुस्ती यामध्ये सातत्य राखण्यासाठी मदत मिळणार असल्याचे स्पर्धेचे प्रायोजक बाबा रॉड्रिक्स यांनी सांगितले.
याआधी स्पर्धेचे उदघाटन अर्जुन पुरस्कार विजेते व डेव्हिस कूपर गौरव नाटेकर, आशियांतील एकमेव महिला गोल्ड बॅच आयटीएफ रेफ्री शितल अय्यर, स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, डीएस रामा राव, बाबा रॉड्रिक्स आणि सुभाष सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे:
35 वर्षांवरील पुरुष एकेरी: 1.रवींद्र पांडे, 2. गणेश देवखिळे, 3, अर्जुन उप्पल, 4.मिलिंद मारणे; 40 वर्षांवरील एकेरी: 1.आदित्य खन्ना, 2.कमलेश शुक्ला, 3.एस दोडी,4. मंदार वाकणकर, 45 वर्षांवरील पुरुष एकेरी: 1.नितीन कीर्तने, 2. सुनील लुल्ला, 3, दीपक पाटील, 4. राजीव अरोरा; 60 वर्षांवरील पुरुष एकेरी: 1. डॉदीपांकर चक्रवर्ती, 2.अनिल निगम, 3.ओम प्रकाश चौधरी, 4.नरेश वीज; 65 वर्षांवरील पुरुष एकेरी: 1. योगेश शहा, 2. किशोर चौधरी, 3. राजेंद्रसिंग राठोड, 4. महेंदर कक्कड.
महत्त्वाच्या बातम्या –
बापरे! २९ वर्षांपुर्वी चालू सामन्यातच खेळाडूवर झाला होता चाकूने हल्ला, पुढे…