सध्या भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतीतून सावरत आहे. जवळपास सहा महिन्यांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असून, तो थेट आयपीएलमधून पुरागमन करणार असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी आता भारतीय संघाचा दुसरा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा देखील मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून दूर होणार असल्याचे दिसत आहे. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत आपण हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले.
भारतीय वनडे संघातील गोलंदाजांपैकी एक असलेला कृष्णा हा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाला होता. त्याला पाठीची दुखापत झालेली. तेव्हापासून तो कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळलेला नाही. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर एक छायाचित्र पोस्ट केले. यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्याने या छायाचित्रला कॅप्शन देत लिहिले,
‘क्रिकेटपासून दूर राहून वाईट वाटत आहे. मात्र, मी लवकरच येईल.’ त्याच्या या छायाचित्रावर अनेक संघ सहकाऱ्यांनी कमेंट करत त्याच्या बरे होण्याची प्रार्थना केली. सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांनी त्याला लवकर बरे हो म्हटले.
कृष्णा या दुखापतीतून लवकर सावरण्याची शक्यता कमी आहे. कृष्णा या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये देखील सहभागी होऊ शकणार नाही. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रयत्न करतो. मागील वर्षी तो राजस्थानसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज ठरलेला. या व्यतिरिक्त त्याला यंदा भारतातच होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी देखील भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता होती. मात्र, या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी जवळपास सहा महिन्याचा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो विश्वचषकात देखील खेळण्याची शक्यता अत्यंत कमी दिसून येते. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळण्यात येईल.
(Prasiddh Krishna Might Miss Most Of Cricket In 2023 Including IPL And ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत डेविड वॉर्नर खेळणार की नाही? कर्णधार पॅट कमिन्सने दिले उत्तर
दिल्लीत बदलले टीम इंडियाचे हॉटेल! ‘या’ कारणाने बोर्डाला घ्यावा लागला निर्णय