जगातील यशस्वी कर्णधारांमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्याही नावाचा समावेश होतो. त्याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे. प्रत्येक देशातील क्रिकेट चाहत्याचा तो आवडता क्रिकेटपटू आहे. भारतीय खेळाडूंसोबतच तो परदेशातील खेळाडूंचाही आदर्श खेळाडूंपैकी एक आहे. नुकतेच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याने धोनीबद्दल एक खास खुलासा केला आहे.
काय म्हणाला शार्दुल ठाकूर?
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने एका पॉडकास्टमध्ये सांगितले की, एमएस धोनी (MS Dhoni) हा कशाप्रकारे नवीन खेळाडूंशी चर्चा करतो. दिल्लीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोसट केला, ज्यात शार्दुलने धोनीबद्दल चर्चा केली.
मागील आयपीएल हंगामात दिल्ली संघात सामील झालेल्या शार्दुलने आपल्या माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल एका पॉडकास्टमध्ये म्हटले की, “एमएस धोनीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, तो प्रत्येक व्यक्तीला भेटतो, जसे कुणी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटत आहे. हे सर्वांनाच माहिती आहे की, त्याच्या खोलीचा दरवाजा नेहमीच उघडा असतो. तसेच, तुम्ही त्याच्या खोलीत गेलात, तर तो नेहमीच तुमचे चांगल्याप्रकारे स्वागत करेल. त्यामुळे त्याची ही सर्वात मोठी खासियत आहे की, तो प्रत्येक व्यक्तीशी अशाप्रकारे वागतो, जसे तो आपल्या जवळच्या व्यक्तीशी वागत आहे.”
विशेष म्हणजे, शार्दुल ठाकूर दिल्ली संघापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाकडूनही खेळला आहे. सीएसके संघात त्याचा कर्णधार एमएस धोनी होता. तसेच, हे दोघेही भारतीय संघासाठी एकत्र खेळले आहेत. त्यामुळे शार्दुल ठाकूर याने धोनीच्या शानदार व्यक्तित्वाचा खुलासा केला. तसेच, सांगितले की, सर्व खेळाडूंसाठी त्याचे दरवाजे नेहमीच उघडे असतात. शार्दुल सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाशी जोडला गेला आहे. त्याला भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंच्या रूपात सामील करण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारताने कार्तिकच्या जागी पंतला खेळवले पाहिजे’, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने दिला फुकटचा सल्ला
टी20 वर्ल्डकपमध्ये केन विल्यमसनचीच कॅप्टन्सी भारी! इतिहासात तीन वेळा संघाची सेमीफायनलमध्ये एंट्री