न्यूझीलंड संघ 2 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिकेच्या दोन्ही सामन्यांचा निकाल अनिर्णित राहिला. मात्र, वनडेत न्यूझीलंडने बाजी मारली. पाकिस्तानने पहिला वनडे सामना खिशात घातल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तसेच, मालिकाही नावावर केली. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) कराची येथे खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने 11 चेंडू शिल्लक ठेवत 2 विकेट्सने पाकिस्तान संघावर विजय मिळवला.
तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्यावर उलटला. पाकिस्तानने फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 280 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 48.1 षटकात 8 विकेट्स गमावत 281 धावा केल्या आणि सामना खिशात घातला.
A brilliant half-century from Glenn Phillips gives New Zealand a series victory 😮#PAKvNZ | 📝 https://t.co/4pBVMuSohu pic.twitter.com/3fgcKNTxzz
— ICC (@ICC) January 13, 2023
फखर जमानचे शतक व्यर्थ
पाकिस्तान संघाकडून सलामीवीर फखर जमान (Fakhar Zaman) याने या सामन्यात शतकी खेळी साकारली होती. त्याने 122 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊसही पाडला होता. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद रिझवान याने 74 चेंडूत 77 धावांची खेळी साकारली होती. तसेच, आगा सलमान यानेही 45 धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
यावेळी न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना टीम साऊदी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटके गोलंदाजी करताना 56 धावा देत 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त लॉकी फर्ग्युसन (2), मिचेल ब्रेसवेल आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 1 विकेट्सची कमाई केली.
न्यूझीलंडकडून तिघांनी झळकावलं अर्धशतक
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना अर्धशतक झळकावण्यात यश आले. त्यात डेवॉन कॉनवे, कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि ग्लेन फिलिप्स यांच्या नावाचा समावेश होता. कॉनवे आणि विलियम्सन यांनी अनुक्रमे 52 आणि 53 धावांची खेळी केली. शेवटी फिलिप्सच्या दमदार खेळीमुळे न्यूझीलंडने पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. त्याने 42 चेंडूत 63 धावांची खेळी केली. यामध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता.
बाबर आझमचे कर्णधारपद धोक्यात
बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान संघ खास कामगिरी करू शकला नाहीये. मागील वर्षी आशिया चषक आणि टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता या वर्षीच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध त्यांना एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. अशात बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. (pak vs nz Cricketer babar azam another loss from kane williamson newzealand team in odi series )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आणखी एक क्रिकेटपटू बीसीसीआयची वाट पाहून कंटाळला! म्हणाला, ‘विदेशात खेळण्याची….’
जड्डूची टीम इंडियात एंट्री एवढी पण सोपी नाही! ऑस्ट्रेलियाला भिडण्याआधी करावे लागेल ‘हे’ एक काम