टॉप बातम्या

पावसानंतर विजय पाकिस्तानच्या अजून जवळ, डीएलएसनुसार करायच्या आहेत फक्त ‘इतक्या’ धावा

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात शनिवारी(4 नोव्हेंबर) विश्वचषक स्पर्धेतील 35 वा सामना आयोजित केला गेला. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केली. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाही सुरुवातीच्या षटकांमध्ये धमाकेदार खेळी करत होता. पण पावसामुळे खेळ थंबवला गेला. पवसानंतर पाकिस्तानला विजयासाठी मिळालेले लक्ष्य कमी केले गेले.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा खेळला जात आहे. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या नुकसानावर 401 धावा केल्या. प्रत्युत्तारत पाकिस्तान संघाला विजयासाठी 402 धावा हव्या होत्या. पाऊसाने मैदानात हजेरी लावण्याआधी पाकिस्तानची धावसंख्या 21.3 षटकांमध्ये 1 विकेटच्या नुकसानावर 160 धावा केल्या होत्या. अशात विजयासाठी त्यांना अजून 240 पेक्षा अधिक धावा हव्या होत्या.

मात्र, पावसामुळे वेळ वाया गेल्यानंतर पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार त्यांचे लक्ष्य 41 षटकांमध्ये 342 धावांपर्यंत कमी केले. सायंकाळी 6.20 मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर पाकिस्तानला अजून 19.3 षटकांमध्ये 182 धावा करायच्या होत्या. यादरम्यन त्यांना 34 ते 41 या षटकांमध्ये पावरप्ले असेल. तसेच चार गोलंदाजाचा कोटा हा 8 षटकांचा निश्चित केला गेला आहे. तर एक गोलंदाज 9 षटके टाकू शकेल.  (Pakistan’s revised target is 342 and they need 182 more runs in the last 19.3 overs)

उभय संघांचील प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, केन विलियम्सन (कर्णधार), रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, मिचेल सँटनर, टिम साउदी, ईश सोढी, ट्रेंट बोल्ट.

पाकिस्तान – अब्दुल्लाह शफीक, फखर जमान, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, हसन अली, मोहम्मद वसीम, उसामा मीर, शाहीन आफ्रीदी, हॅरिस रौफ.

महत्वाच्या बातम्या – 
WC 2023 । श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या घडामोडी, बोर्डाच्या सचिवांचा राजीनामा, जाणून घ्या कारण
न्यूझीलंडने उतरवली पाकिस्तानच्या ‘पेस बॅटरी’ची पॉवर! शाहिन-रौफच्या नावे लाजिरवाणे विक्रम 

Related Articles