पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करण्याची इच्छा व्यक्त करताना आज(26 जूलै) कसोटीमधून निवृत्ती घोषित केली आहे.
अमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 30.47 च्या सरासरीने 119 विकेट्स घेतले आहेत. त्याने 2009 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
त्यानंतर मात्र 2011 च्या लॉड्स फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. पण त्यांनतर त्याने 2016 ला पुनरागमन केले. तसेच 2017मध्ये पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2019 ला जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे.
कसोटीतून निवृत्ती घेताना अमीरने म्हटले आहे की ‘पाकिस्तानचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटकडे लक्ष्य क्रेंदित करण्यासाठी कसोटीपासून दूर होण्याचा मी निर्णय घेतला आहे.’
‘पाकिस्तानसाठी खेळणे हे माझे अंतिम ध्येय आणि उद्धिष्ट आहे. मी माझे सर्वोत्तम शारिरिक स्वास्थ ठेऊन पुढीलवर्षी होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासह संघाच्या पुढील आव्हानांमध्ये योगदान देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेल.’
तसेच अमीरने हीच कसोटीतून निवृत्त होण्याची योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. तो पुढे म्हणाला, ‘आयसीसी वर्ल्ड चॅम्पियन्सशीप लवकरच सुरु होत आहे. पाकिस्तानकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत आणि माझी कसोटीतून निवृत्तीची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे निवडकर्ते त्यानुसार पुढील योजना बनवू शकतात.’
त्याचबरोबर अमीरने कसोटीतील त्याच्या संघसहकाऱ्यांचे तसेच प्रतिस्पर्ध्यांचे आभार मानले आहेत. अमीरने कसोटीतून निवृत्ती घेतली असली तरी तो वनडे आणि टी20 क्रिकेट खेळत राहणार आहे.
BREAKING: Mohammad Amir announces his retirement from Test cricket. pic.twitter.com/pFjAkMImHz
— ICC (@ICC) July 26, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल दिडवर्षांनंतर त्या तिन्ही क्रिकेटपटूंचे झाले ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात पुनरागमन
–नॉट आऊट असतानाही पॅव्हेलियनमध्ये परतला युवराज सिंग, पहा व्हिडिओ
–…म्हणून लसिथ मलिंगा घेतोय वनडे क्रिकेटमधून निवृत्ती