न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वनडे विश्वचषक २०२२ चा (ICC ODI World Cup 2022) विसावा सामना सोमवारी (२१ मार्च) पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज (PAKW vs WIW) संघात झाला. हॅमिल्टन येथे झालेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने केवळ २० षटकेच खेळवली गेली. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला २० षटकांमध्ये ७ बाद ८९ धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने १९ षटकांमध्येच २ विकेट्सच्या नुकसानावर वेस्ट इंडिजचे लक्ष्य पूर्ण केले आणि ८ विकेट्स राखून सामनाही जिंकला. हा पाकिस्तान महिला संघाचा विश्वचषक २०२२ मधील पहिलाच विजय आहे.
पाकिस्तानच्या या विजयामुळे भारतीय संघाला फायदा झाला आहे. कारण आता भारतीय संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग थोडा सोपा झाला आहे.
अशी आहेत समीकरणे
वेस्ट इंडिजच्या पराभवानंतर गुणतालिकेत फारसे बदल झालेले नाहीत. वेस्ट इंडिजचा संघ ६ पैकी ३ सामने जिंकत आणि ३ सामने गमावत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात एकूण ६ गुण आहेत. आता त्यांचा साखळी फेरीतील केवळ एकच सामना बाकी आहे.
वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे भारत आणि इंग्लंड संघांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे. या दोन्ही संघांचे अजून प्रत्येकी २ सामने बाकी आहेत. तसेच त्यांचे गुणही (४ गुण) समान आहेत. अशात जर भारत आणि इंग्लंडने त्यांचे दोन्हीही सामने जिंकले आणि वेस्ट इंडिजनेही त्यांचा शेवटचा सामना जिंकला, तर या तिन्हीही संघांचे गुण ८ इतके होतील. अशावेळी नेट रन रेटवरून उपांत्य फेरीत जाणारे २ संघ निश्चित होतील.
Pakistan open their account in #CWC22 standings ???? pic.twitter.com/Buvjc7v7cW
— ICC (@ICC) March 21, 2022
मात्र जर वेस्ट इंडिजने त्यांना शेवटचा सामना गमावला, तर भारत आणि इंग्लंडला फायदा होऊ शकतो. हे संघ २ पैकी १ सामनाही जिंकत उपांत्य फेरीत जाऊ शकतात, मात्र त्यावेळी सर्वकाही नेट रन रेटवर अवलंबून असेल. याउलट जर त्यांनी राहिलेले दोन्हीही सामने जिंकले, तर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीतून बाहेर पडेल आणि हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. याशिवाय न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान संघ अगोदरच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर ऐतिहासिक विजय, तब्बल १३ वर्षांनंतर वनडे विश्वचषकात जिंकला सामना
गंभीरला १२वी मधील भांडणं पडलेली महागात, थेट दोन महिन्यांसाठी केलेलं कॉलेजमधून सस्पेंड
आयपीएलमधील ‘या’ पराक्रमांमध्ये गेलच ‘बॉस’, गेल्या ९ वर्षांपासून अबाधित आहेत विक्रम