---Advertisement---

“पाकिस्तानचा 10 वर्षाचा वनवास संपला” चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी काय म्हणाला पाकिस्तानी कर्णधार?

Cricketer-Mohammad-Rizwan-
---Advertisement---

यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राफी (ICC Champions Trophy 2025) सुरू होण्याची तारीख अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चॅम्पियन्स ट्राॅफी उद्यापासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. ही मेगा स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जाईल. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) काय म्हणाला याबद्दल आपण जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास फक्त काही तास शिल्लक आहेत. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान या मेगा स्पर्धेसाठी उत्साहित दिसत होता. मंगळवारी (18 फेब्रुवारी), त्याने त्याच्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तोच जोश दाखवण्यास सांगितले, जो त्यांनी 10 वर्षांच्या काळात दाखवला होता. ज्यावेळी कोणताही संघ पाकिस्तानचा दौरा करत नव्हता. याचे कारण मार्च 2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेला दहशतवादी हल्ला होता.

या दशकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड सारख्या दिग्गज संघांनी पाकिस्तानचा दौरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, 2015 मध्ये पाकिस्तानने झिम्बाब्वेचे यजमानपद भूषवले. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 3 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला. या 10 वर्षांत पाकिस्तानने खूप संघर्ष केला आणि दौऱ्यावर देशांतर्गत सामनेही खेळले.

मंगळवारी (18 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) म्हणाला, “मला वाटते की सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आनंद घ्यावा कारण बऱ्याच काळानंतर आपण पाकिस्तानमध्ये इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत आहोत.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “10 वर्षे इतरत्र घरच्या मैदानावर खेळल्यानंतर. जर तुम्ही पाहिले तर, आम्ही संघर्ष करत असलेल्या त्या 10 वर्षांतही, पाकिस्तान क्रिकेटने चांगली कामगिरी केली आणि कसोटीत नंबर वन संघ बनणे आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे यासह अनेक मोठे सामने जिंकले. मला आशा आहे की आपण या स्पर्धेतही असेच करू.”

महत्त्वाच्या बातम्या-

भारत, ऑस्ट्र्र्रेलियाला जमलं नाही ते अमेरिकेने करून दाखवलं! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास
चॅम्पियन्स ट्राॅफीच्या इतिहासात किती वेळा भिडले भारत-पाकिस्तान? कोणी गाजवले वर्चस्व?
चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये 3 अष्टपैलू खेळाडू घालणार धूमाकूळ! भारतासाठी हार्दिक पांड्या ठरणार ट्रम्प कार्ड?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---