क्रिकेटटॉप बातम्या

पाकिस्तानात चालले तरी काय? 36 तासांत तीन खेळाडू निवृत्त; आता 7 फूट उंच क्रिकेटपटूने क्रिकेट सोडले

पाकिस्तान क्रिकेटमध्ये चालाय तरी काय? अवघ्या 36 तासांत देशातील 3 क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. आता पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाजीत कहर करणाऱ्या मोहम्मद इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 42 वर्षीय इरफानने सुमारे 5 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघासाठी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर इरफान नियमितपणे देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. मात्र आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

निवृत्तीबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत तो म्हणाला, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला भरभरून प्रेम आणि ते अविस्मरणीय क्षण दिल्याबद्दल मी माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचे, प्रशिक्षकांचे, सर्वांचे आभार मानतो. मी त्या खेळाला सपोर्ट करत राहीन. ज्याने मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.”

मोहम्मद इरफानने 2012 मध्ये पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आपल्या 7 फूट उंचीने जगातील सर्वोत्तम फलंदाजांना अडचणीत आणले. त्याच्या कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास त्याने पाकिस्तानकडून 60 एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधितीत्व ज्यात त्याने 83 बळी घेतले. तसेच 22 टी20 सामनेही खेळले. ज्यामध्ये त्याने 16 विकेट्स घेतल्या. तो कसोटी क्रिकेटमध्ये फक्त 4 सामने खेळला, ज्यामध्ये इरफानने 4 फलंदाजांना बाद केले.

गेल्या 36 तासांत निवृत्ती घेणारा मोहम्मद इरफान हा तिसरा पाकिस्तानी खेळाडू आहे. हा क्रम गेल्या शुक्रवारपासून सुरू झाला. पहिल्यांदा इमाद वसीम तर मोहम्मद आमिरने दुसऱ्यांदा निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आमिर आणि वसीम याआधीच निवृत्त झाले होते. परंतु त्यांनी 2024 च्या टी20 विश्वचषकापूर्वी पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मोहम्मद इरफानसाठी त्याने निवृत्तीची घोषणा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. डोमेस्टिक व्यतिरिक्त, इरफान फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील खूप सक्रिय आहे.

हेही वाचा-

“मी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन…” भारताच्या प्रतिभावान खेळाडूचे मोठे वक्तव्य!
2024 मध्ये अनेक दिग्गजांनी घेतली निवृत्ती, यादीत ‘रोहिराट’चाही समावेश
गाबा कसोटीत टॉस जिंकून भारतानं गोलंदाजी का निवडली? रोहित शर्मानं सांगितलं कारण

Related Articles