पाकिस्तानमध्ये आणखी एका क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू रियाज शेख मंगळवारी (2 मे) दुसरा व्यावसायिक क्रिकेटपटू ठरला, ज्याचे कोरोना व्हायरसच्या आजाराने निधन झाले आहे. रियाजच्या परिवाराने त्यांना घाईगडबडीत दफन केले आहे.
रियाजचा मृत्यू
रियाज (Riaz Sheikh) यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची (Corona Virus) लागण झाली होती. ते 51 वर्षांचे होते. त्यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले होते.
सूत्रांनी सांगितले, “त्यांच्या परिवाराने सकाळी घाईगडबडीत त्यांचे शरीर पुरले. त्यांच्या शेजाऱ्यांना अशी शंका आहे, की रियाजला कोविड-19ची लागण झाली होती आणि त्यांच्या परिवाराला त्या सरकारी प्रक्रियेमधून जायचे नव्हते, जी या व्हायरसमुळे मरणाऱ्या बाधित व्यक्तींसाठी तयार करण्यात आली आहे.”
राशिद लतीफने व्यक्त केले दु:ख
रियाजच्या झालेल्या अचानक झालेल्या निधनावर पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक राशिद लतीफ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. रियाज यांनी 1987 ते 2005 दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेट (First Class Cricket) खेळले. कराचीचे फिरकीपटू रियाज यांनी निवृत्तीनंतर मोईन खान क्रिकेट अकादमीत क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी या अकादमीमधील मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते.
पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ डॉ. नॉमन नियाजनेदेखील रियाज यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. त्यांनी रियाज यांची प्रशंसा करत म्हटले, “रियाज एक उत्साही फिरकीपटू होता, ज्याने 43 सामन्यांमध्ये 116 विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याने 4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आणि एकदा सामन्यात त्याने 10 विकेट्सही पटकावल्या होत्या. 60 धावा देत 8 विकेट्स घेण्याची त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. ते 51 वर्षांचे होते.”
सरफराजचेही झाले निधन
एप्रिलमध्ये पाकिस्तानचा माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू झफर सरफराजचेही (Zafar Sarfraz) कोरोना व्हायरसमुळे निधन झाले होते. ते 50 वर्षांचे होते. त्यांनी पेशावरच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते मधल्या फळीतील डावखुरे फलंदाज होते. त्यांनी 15 सामन्यांमध्ये 616 धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विश्वचषकात मानाची ‘गोल्डन बॅट’ मिळवण्याचा पराक्रम करणारे ३ भारतीय दिग्गज
-चक्क! लॉकडाऊनमध्ये धोनीने विकत घेतला ट्रॅक्टर; पहा तुफान व्हायरल व्हीडिओ
-मजदूरांना अन्न पुरवण्यासाठी या भारतीय गोलंदाजांने लावला घराबाहेर स्टॉल