पाकिस्तानचा माजी सलामीवीर फलंदाज तौफिक उमर कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून सध्या तो आपल्या घरामध्येच क्वारंटाईन झाला आहे. क्रिकेट पाकिस्तानने उमर कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी दिली आहे.
पाकिस्तान संघासाठी उमरने (Taufeeq Umar) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ४४ कसोटी सामने आणि २२ वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ७ शतके आणि १४ अर्धशतके ठोकली आहेत. तर वनडेत त्याने केवळ ३ अर्धशतके ठोकले आहेत. २००१ दरम्यान उमर पाकिस्तान क्रिकेटचा महत्त्वाचा सदस्य राहिला होता.
उमरने आपला शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळला होता. तसेच वनडेतील शेवटचा सामना त्याने आयर्लंडविरुद्ध २०११मध्ये खेळला होता. उमरने विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघासाठी मोलाचे योगदान दिले. तरी त्याला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही.
पाकिस्तान क्रिकेट संघात उमर सलामीवीर फलंदाज म्हणून आपले योगदान देत होता. भारत आणि पाकिस्तान संघात २००५मध्ये मोहाली कसोटी सामन्यातदेखील उमर पाकिस्तान संघाचा भाग होता. तो कसोटी सामना अनिर्णित झाला होता.
उमरने मुल्तान (Multan) येथील बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात १०४ धावांची उत्कृष्ट शतकी खेळी केली होती.
सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने (Corona Virus) हाहाकार माजवला आहे. पाकिस्तानमध्ये ५० हजारपेक्षा अधिक लोक या व्हायरसमुळे बाधित झाले आहेत.
जगभरात कोरोना व्हायरस (Corona Virus) पसरल्यानंतर क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. या व्हायरसमुळे आयसीसी टी२० विश्वचषकावरही धोक्याचे सावट पसरताना दिसत आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-जडेजा, विराट नाही तर टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक
-क्रिकेटमधील ‘ही’ गोष्ट आमच्यासाठी असेल सर्वात कठीण काम
-आजोबांचे स्वप्न राहिले अधुरे; मॅच फिक्सिंगमुळे नाही खेळू शकला १००वा कसोटी सामना