भारतीय संघ सध्या मायदेशात दक्षिण आफ्रिका संघासोबत तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकात भारताला त्यांचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. पाकिस्तानसोबतचा हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रउफ याला पूर्ण विश्वास आहे की, तो या मैदानात भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करेल. या मैदानाला तो चांगल्या प्रकारे ओळखतो, असेही त्याने सांगितले.
पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळत आला आहे. त्याने या लीगमध्ये मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्व केले आणि याच कारणास्तव मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (Melbourne Cricket Ground) त्याच्यासाठी होम ग्राउंड असल्यासारखेच आहे. या मैदानात भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी तो उत्सुक असल्याचे दिसत आहे. हारिस रउफ (Haris Rauf) म्हणाला की, “जर मी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करू शकलो, तर त्यांच्यासाठी (भारत) माझी गोलंदाजी खेळणे सोपी गोष्ट नसेल. मी खूप आनंदी आहे की, हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होत आहे.”
“हा माझे होम मैदान आहे, कारण मी मेलबर्न स्ट्रार्ससाठी खेळतो. मला माहिती आहे, तिथे कसे खेळायचे. भारताविरुद्ध कशी गोलंदाजी कराचयी, याविषयी मी रणनीती बनवायला देखील सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खूपच दबाव असतो. विश्वचषकात मी हा दबाव अनुभवला आहे. पण आशिया चषकातील मागच्या दोन सामन्यांमध्ये तो दबाव जाणवला नाही. कारण मला माहिती होते, मला माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करायचे आहे,” असेही रउफ पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील राजकीय तनावांमुळे या दोन संघात द्विपक्षिय मालिका खेळली जात नाही. दोन्ही संघ फक्त विश्वचषक आणि आशिया चषकासारख्या प्रमुख स्पर्धांमध्येच एकमेकांसोबत खेळत असतात. असे असले तरी, मागच्या एका वर्षात चाहत्यांना या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांना तीन वेळा आमने सामने पाहता आले. आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध दहा विकेट्सने पारभूत झाला होता. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताला मात दिली होती. त्यानंतर काही आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या आशिया चषकात हे संघ दोन वेळा आमने सामने आले. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तान 4 विकेट्स पराभूत झाला, पण सुपर फोरमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काहीच संबंध नसताना बुमराहमुळे ट्रोल होतोय जोफ्रा आर्चर, जाणून घ्या चाहत्यांचे म्हणणे
‘त्यांच्यासोबतच असे झाले पाहिजे’, दिप्ती शर्माच्या रन आउट वादावर बोलली एलिस पेरी
बीसीसीआयचा ‘तो’ एक निर्णय टीम इंडियावर भारी, टी20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न राहणार अधुरेच!