पाकिस्तान क्रिकेटच्या संकटांमध्ये दिवसेंदिवस चांगलीच भर पडत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातील तब्बल १० खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता तो पूर्ण दौरा रद्द होऊ शकतो. त्यानंतर स्थानिक सामन्यांमध्ये क्वारंटाईन नियमांचा भंग केल्याने एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. अशातच, पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने पाकिस्तान क्रिकेट संघ व्यवस्थापनावर काही गंभीर आरोप केल्याने पीसीबीची डोकेदुखी वाढलेली दिसून येते.
खेळाडू संघ व्यवस्थापनाला घाबरतात
सध्या लंका प्रीमियर लीगमध्ये गाले ग्लेडिएटर्सचा सदस्य असलेल्या आमिरने आपल्या देशाच्या संघ व्यवस्थापनावर अनेक आरोप केले. खेळाडूंना विचारात न घेता बोर्ड मनमानी कारभार करत असल्याची टीका त्याने केली. एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “संघातील खेळाडू संघ व्यवस्थापनाला खूप घाबरतात. कोणाला विश्रांतीची गरज असली, तरीही तो खेळाडू ते कधीही सांगत नाही. त्यांना भीती वाटते की, आपल्याला संघाबाहेर काढतील. संघ व्यवस्थापन आणि खेळाडू यांच्यात काही आलबेल नाही.”
खेळाडू आणि संघ व्यवस्थापनात सुसंवाद हवा
सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर असलेला आमिर पुढे म्हणाला, “पाकिस्तानी खेळाडूंमध्ये अशी मानसिकता तयार झाली आहे की, कोणीही पुढे होऊन बोलायची हिंमत दाखवत नाही. व्यवस्थापनाने खेळाडूंसोबत बोलायला हवे. खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील दरी कमी व्हायला हवी. सुसंवाद वाढायला हवा. खेळाडूंच्या मनातील संघातून बाहेर होण्याची भीती जाणे गरजेचे आहे.”
कसोटी निवृत्तीबाबत आर्थर यांच्याशी बोललो होतो
आपल्या कसोटीतून निवृत्ती घेण्याच्या कारणाविषयी आमिर बोलला, “मी कसोटीतून निवृत्ती घेण्याविषयी माजी प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याशी २०१७ मध्ये बोललो. मी त्यांना म्हटलं होतं, माझ्यावरील जबाबदाऱ्यांचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर, मला कसोटी क्रिकेट सोडावे लागेल.”
आमिरने गेल्यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो फक्त वनडे आणि टी२० क्रिकेट खेळतोय. पीसीबीने त्याचा समावेश मध्यवर्ती करारात केलेला नाही. सध्या तो राष्ट्रीय संघाचा भाग देखील नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ