fbpx
Tuesday, January 26, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’

November 27, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
0
Photo Courtesy: Twitter/ TheRealPCB

Photo Courtesy: Twitter/ TheRealPCB


न्यूझीलंड दौर्‍यावरील पाकिस्तान क्रिकेट संघातील सहा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची पुष्टी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी (२६ नोव्हेंबर) केली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ माजली आहे. या सहा जणांना ख्राइस्टचर्चमध्ये ओयसोलेशनमध्ये ठेवले आहे. खरंतर पाकिस्तानी खेळाडूंनी ३-४ वेळा कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे आता थेट न्यूझीलंड सरकारनेच पाकिस्तानी संघांला चेतावणी दिली आहे की आता एकही चूक झाली तर त्यांना देशाबाहेर काढले जाईल.

त्याचबरोबर पाकिस्तान संघाला आयसोलेशनदरम्यान सरावासाठी मिळालेल्या सूटवरही आता बंदी घातली आहे.

याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी माहिती दिली. वसीम खान यांनी क्रिकइन्फोला सांगितले की ‘मी न्यूझीलंड सरकारशी चर्चा केली. न्यूझीलंड सरकारने सांगितले आहे की पाकिस्तान संघाने ३-४ वेळा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे उल्लंघन केले आहे. न्यूझीलंड हे सहन करणार नाही. त्यांनी आम्हाला अंतिम चेतावणी दिली आहे. मला माहित आहे की आमच्यासाठी हा कठिण काळ आहे. आम्हाला इंग्लंडमध्येही अशा स्थितीचा सामना करावा लागला होता.’

…तर देशाबाहेर काढले जाईल 

तसेच वसीम खान म्हणाले, ‘आमच्यासाठी हे सोपे असणार नाही. आमच्यासाठी हा देशाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. मी माझ्या खेळाडूंना सूचना दिली. मी त्यांना १४ दिवस स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. यानंतर आपण कुठेही फिरु शकता. न्यूझीलंडने आम्हाला स्पष्ट सांगितले आहे की एक जरी चूक झाल्यास आमच्या संघाला घरी पाठवले जाईल. हे खूप अपमानास्पद असेल.’

पाकिस्तानचा संघ मंगळवारी (२४ नोव्हेंबर) न्यूझीलंडला पोहचला आहे. पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध १८ डिसेंबरपासून ३ टी२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. पाकिस्तान संघाने या दौऱ्यापूर्वी बाबर आझमला कसोटीचा कर्णधार म्हणून निवडले होते. ही त्याची कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. याव्यतिरिक्त आझम आधीपासूनच वनडे आणि टी२० क्रिकेट संघाचे नेतृत्त्व करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय

ऑस्ट्रेलियन खेळाडूने बांधली हार्दिकच्या बुटाची लेस, व्हिडिओ व्हायरल

विराटची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर पुन्हा अपयशी


Previous Post

अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय

Next Post

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

Related Posts

Photo Courtesy: www.iplt20.com
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ लिलावाची तारीख ठरली ! ‘या’ ठिकाणी होणार लिलाव

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मिचेल स्टार्क ऐवजी दुसऱ्या गोलंदाजाला संघात स्थान द्या”, माजी कर्णधाराने केली मागणी

January 25, 2021
टॉप बातम्या

क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांची ‘आझम कॅम्पस’ ला भेट 

January 25, 2021
टॉप बातम्या

‘बाऊंसर’ चेंडूवर येणार बंदी ? ‘हे’ आहे कारण

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बांगलादेशने दिला वेस्ट इंडिजला ‘व्हाईटवॉश’, तिसऱ्या सामन्यात केली एकतर्फी मात

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@RSWorldSeries
टॉप बातम्या

पुन्हा घुमणार ‘सचिन..सचिन’ चा आवाज; सुरू होणार ‘ही’ मोठी स्पर्धा

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

Photo Courtesy: Twitter/ ICC

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का! 'हा' खेळाडू दुसऱ्या वनडेला मुकण्याची शक्यता

आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानचे कोलकाता डर्बीत वर्चस्व

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.