क्रिकेट चाहत्यांसाठी रविवारचा (दि. 06 नोव्हेंबर) दिवस खूपच खास आहे. या दिवशी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील 3 सामन्यांची मजा प्रेक्षकांना लुटायला मिळणार आहे. यातील पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स संघात पार पडला. या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढले. यामुळे भारता फायदा झाला आणि भारत उपांत्य सामन्यात पोहोचला. स्पर्धेतील दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. हा सामना पाकिस्तान संघाने 5 विकेट्सने जिंकला. तसेच, उपांत्य सामन्यात प्रवेश केला.
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 128 धावा केल्या आणि पाकिस्तान संघाला 129 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पाकिस्तान संघाने 5 विकेट्स गमावत पार केले.
Against all odds, Pakistan have made it to the #T20WorldCup semi-finals 🎉 pic.twitter.com/VQjtNpbfYc
— ICC (@ICC) November 6, 2022
पाकिस्तानचा विजय
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 32 चेंडूत 32 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 2 चौकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त हॅरिस रौफ यानेही 31 धावांचे योगदान दिले. तसेच, कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यानेही 25 धावांचे योगदान दिले. तसेच, शान मसूद यानेही नाबाद 24 धावा चोपल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना नसूम अहमद आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतल्या.
बांगलादेशचा डाव
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून सलामीवीर नजमुल शांतो (Najmul Shanto) याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने यावेळी 48 चेंडूत 54 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 7 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त अली हुसेन (नाबाद 24) आणि सौम्य सरकार (20) यांनाच 20 धावांचा आकडा गाठता आला. कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा खराब पंचगिरीमुळे शून्य धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त फक्त लिटन दास याला 10 धावा करता आल्या. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही.
यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 22 धावा देत 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त शादाब खान याने 2, तर हॅरिस रौफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
या विजयानंतर पाकिस्तान उपांत्य सामन्यात पोहोचल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आता उपांत्य सामन्यांमध्ये काय होतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द. आफ्रिका पुन्हा चोक! नेदरलँड्सकडून पराभूत होऊन नामुष्कीरित्या विश्वचषकातून बाहेर
बिग ब्रेकिंग! श्रीलंकन क्रिकेटपटूला बलात्काराच्या आरोपाखाली सिडनीतून अटक