नवी दिल्ली । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मागील काही दिवसांमध्ये पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी त्याने जगभरात पसरलेल्या भयानक कोरोना व्हायरसदरम्यान आपली संस्था शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनमार्फत पाकिस्तानमधील गरजू लोकांना मदत केली.
यावेळी तो पाकव्याप्त काश्मीरमध्येही पोहोचला होता. तरी तिथे तो लोकांची मदत करण्याऐवजी काही वेगळेच करताना दिसला. तिथे त्याने राजनैतिक हेतू साधण्याच्या प्रयत्नात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काश्मीरबद्दल वाईट वक्तव्य करताना दिसला.
आफ्रिदीच्या (Shahid Afridi) विवादात्मक वक्तव्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडू आणि चाहत्यांनी त्याला फटकारण्यास सुरुवात केली. याबरोबर पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्ता आरिफ अजाकिया (Arif Aajakia) यांनीदेखील आफ्रिदीला खडसावले.
त्यांनी आफ्रिदीच्या वक्तव्यावर निशाना साधत यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात त्यांनी आफ्रिदीला जरातरी लाज बाळगण्यास सांगितले आहे.
कराचीच्या जमशेद टाऊनचे माजी महापौर असलेले अजाकिया यांनी आफ्रिदीला इतिहासाची आठवण करून देत म्हटले की, तुला असे वक्तव्य करण्यापूर्वी लाज वाटली पाहिजे. तसेच मदत करण्याच्या नावावर पाकिस्तानमध्ये करण्यात आलेला आफ्रिदीचा व्यवहार निंदनीय होता.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अजाकियाने म्हटले की, “आफ्रिदी नेहमीच बडबड करत असतो. त्याला फक्त व्यर्थ बडबड करणारा व्यक्ती म्हटले जाते. खरंतर तो घाबरट आहे. आफ्रिदी ज्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारताच्या पंतप्रधानांविषयी आणि भारतीय सैन्याला आव्हान देत होता. खरंतर ती भारताची स्वत:ची जमीन आहे.”
https://www.youtube.com/watch?v=p8c_iys36S0&feature=emb_logo
अजाकियाने पुढे आफ्रिदीला फरार व्यक्ती सांगत म्हटले की, त्याचे तोंड आपल्या चांगल्या कामाबद्दल कधीच बोलला नाही. परंतु तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन भारत आणि त्यांच्या पंतप्रधानाविषयी बोलण्याची हिंमत ठेवतोय.
ते म्हणाले की, “पाकिस्तान सरकारमध्ये मागील २० वर्षांपासून त्याच्या समुदायाविरूद्ध ऑपरेशन सुरू आहेत, त्यांचा संपूर्ण समुदाय दहशतवादी आणि अतिरेकी बनला आहे. परंतु आफ्रिदीचे तोंड या सर्वांविषयी उघडेल तर खरं. ज्या जम्मू आणि काश्मीरच्या लोकांवर आरोपांबद्दल तो बोलत आहे. तिथे त्याच्याच पूर्वजांनी महिलांवर अत्याचार केले होते. यामध्ये केवळ आफ्रिदीचे पूर्वज नव्हे तर, त्याच्या आजोबांचाही समावेश होता. त्याच्या चुलत भाऊ काश्मीरमध्ये अतिरेकीपणाला चालना देतात आणि भारतीय सैन्याच्या हातून मारले जातात.”