माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीकडून ज्ञानाचे धडे घेण्यासाठी खेळाडू सदैव आतुर असतात. युवा खेळाडूंचे तर त्याला भेटण्याचे स्वप्न असतेच परंतु क्रिकेटचा बराचसा अनुभव असलेले शिलेदारही त्याच्याशी संवाद साधण्याची संधी शोधत असतात. रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक सामना पार पडला. या सामन्यानंतरही असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले.
धोनी सध्या टी२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे इतर भारतीय संघाच्या इतर सपोर्ट स्टाफ सदस्यांसोबत त्यानेही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. पाकिस्तानच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवत पहिल्यांदाच टी२० विश्वचषक सामन्यात भारतीय संघाला धोबीपछाड दिला आणि इतिहास रचला. यानंतर पाकिस्तानच्या ताफ्यात जल्लोषाचे वातावरण पसरले होते.
विजयाचा आनंद साजरा करुन झाल्यानंतर मैदानावरील सर्व वातावरण शांत झाले. यावेळी पाकिस्तान संघाच्या खेळाडूंनी जाऊन धोनीला गाठले. पाकिस्तानचा वरिष्ठ अष्टपैलू शोएब मलिक, इमाद वसीम धोनीसोबत मैदानावर चर्चा करताना दिसले. कर्णधार बाबर आझमनेही या संधीचा लाभ घेत धोनीकडून क्रिकेटचे बाळकडू घेतले. यावेळी धोनीने आझमच्या प्रदर्शनाचे हात मिळवून कौतुकसुद्धा केले. यावेळी हे सर्व क्रिकेटपटू आपले दोन्ही हात मागे बांधून त्याचे बोलणे ऐकत होते.
https://www.instagram.com/reel/CVa-WzzlaWv/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://twitter.com/shujamehdi650/status/1452332251933446148?s=20
याबरोबरच पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहनवाज दहानी हादेखील याक्षणी तिथे उपस्थित होता. सामन्याच्या एक दिवस अगोदर सराव सत्रावेळी मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावरुन धोनीला जाताना पाहून त्याच्याशी संवाद साधण्यासाठी तो खूप उतावीळ झाला होता. त्यामुळे सामन्यानंतर धोनीला प्रत्यक्ष समोरासमोर भेटण्याची संधी त्याने दवडली नाही. यावेळी धोनीसोबत त्याने स्वत:चे फोटोही काढून घेतले. पाकिस्तानी खेळाडूंनी धोनीप्रती दाखवलेला हा आदर कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतो आहे.
Fanboy moment of Young Pakistan Bowler Shahnawaz Dahani ❤#TeamIndia | @MSDhoni | #INDvPAK pic.twitter.com/Sx4oZS3k4P
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) October 24, 2021
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५१ धावा फलकावल लावल्या होत्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावा केल्या होत्या. तसेच रिषभ पंतने ३९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी १५२ धावांची अभेद्य भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी अनुक्रमे ७९ आणि ६८ धावा फटकावत १८ षटकातच संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी
भारतावर पाकिस्तानचा ‘रिकॉर्डब्रेक’ विजय, क्रिकेटविश्वातील सुरमा संघांनाही न जमलेला केला पराक्रम