Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानचा शादाब खान गाजतोय ऑस्ट्रेलियात! ‘गरुडझेप’ घेत पकडला झेल, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानचा शादाब खान गाजतोय ऑस्ट्रेलियात! 'गरुडझेप' घेत पकडला झेल, पाहा व्हिडिओ

December 20, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shadab Khan Catch in BBL

Photo Courtesy: Twitter/BBL


बिग बॅश लीग 2022 या स्पर्धेचा आठवा सामना होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात होबार्ट संघाने 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याने विशेष योगदान दिले होते. त्याने पर्थ संघाच्या फलंदाजीच्यावेळी 19 व्या षटकात फायदेशीर गोलंदाजी केली आणि एक दर्जेदार झेल देेखील पकडला. त्याने घेतलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

होबार्ट संघाचा कर्णधार मॅथ्यू वेड (Mathew Wade) याने 19वे षटक टाकण्यालाठी शादाब खान (Shadab Khan) याला बोलवण्यात आले. शादाबने त्याच्या पहिल्या चेंडूवर एक धाव दिली आणि दुसरा चेंडू निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर त्याने आरोन हार्डी (Aarone Hardie) याचा अत्यंत चपळाईने झेल घेतला. त्याने आपल्याच चेंडूवर हवेत झेप घेत हा अद्भूत झेल पकडला. त्याचबरोबर या अष्टपैलू खेळाडूने आपल्या या षटकात फक्त 4 धावा दिल्या. बीबीएलने या झेलाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलय की, “हा झेल पूर्णपणे हॉरीझॉन्टल होता. स्कॉर्चर्स शेवटच्या षटकात 14 धावा पाहिजे.”

होबर्ट हरिकेन्सने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला-
या सामन्यात होबार्ट हरिकेन्सने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, होबार्टने निर्धारीत षटकात 8 गडी गमावत 172 धावा केल्या. त्यांच्या या डावात मॅथ्यू वेड आणि टिम डेविड यांनी अनुक्रमे 51 आणि 46 धावांची खेळी केली. या सामन्यात पॅट्रीक डूली नंतर शादाब खान हा होबार्ट संघाचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने आपल्या 4 षटकात 22 धावा देत एक गडी बाद केला. शेवटच्या दोन षटकात पर्थ संघाला 18 धावांची गरज होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची नाचक्की! ब्रिस्बेन कसोटी जिंकूनही व्हावे लागले अपमानित; वाचा संपूर्ण प्रकरण
बॉक्सिंग डे कसोटीत वॉर्नला वाहिली जाणार खास श्रद्धांजली; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केले नियोजन


Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

सूर्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतो हा व्यक्ती; स्वतः केलाय खुलासा

Maharashtra Kesari

'महाराष्ट्र केसरी'चा थरार 10 ते 14 जानेवारी दरम्यान रंगणार

Photo Courtesy: Twitter/England Cricket

बॅझबॉल की जय! न्यूझीलंडपासून पाकिस्तानपर्यंत इंग्लंडने सगळ्यांना चोपलयं; कसोटी क्रिकेटवर करतायेत राज्य

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143