गुरूवारी (22 सप्टेंबर) कराची येथे पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (PAKvsENG) दुसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांनी हा सामना जिंकत सात सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत केली आहे. यावेळी आउट ऑफ फॉर्म असणाऱ्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने इंग्लंड विरुद्ध शतक करताच अनेक विक्रम मागे टाकले आहे.
बाबर आझम (Babar Azam) याने 66 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकार फटकारत नाबाद 110 धावा केल्या. शतक करताच त्याने भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित आणि स्वित्झर्लंडचा फहीम नजीर यांचाच समावेश होता. या दोघांनीही प्रत्येकी 2-2 शतके केली आहेत. आता या यादीत बाबरचा समावेश आला आहे. त्याचबरोबर तो पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
बाबरने रोहितची बरोबरी केली तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा एक विक्रम मोडला आहे. बाबरने शतक करताच 8000 टी20 धावा पूर्ण केल्या. टी20मध्ये सर्वात जलद 8000 धावा करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. यामध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. गेलने 214 डावांमध्ये आणि विराटने 243 डावांमध्ये 8000 टी20 धावा पूर्ण केल्या, तर बाबरने 218 डावांमध्येच 8000 टी20 धावा पूर्ण करत विराटला मागे टाकले आहे.
Babar Azam becomes the first Pakistan player to score 2 hundreds in T20I history. pic.twitter.com/0hXV7QvkbA
— Johns. (@CricCrazyJohns) September 22, 2022
नॅशनल स्टेडियम, कराची येथे खेळला गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 199 धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून मोईन अली याने सर्वाधिक नाबाद 55 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.3 षटकातच 203 धावा करत विजय मिळवला. हा विजय मिळवताच पाकिस्तान संघ एकही विकेट न गमावता 200 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला आहे. त्याचबरोबर बाबर हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकणारा पाकिस्तानचा कर्णधार ठरला आहे.
𝐀𝐭 𝐭𝐡𝐞 𝐭𝐨𝐩 🥇
Babar Azam has now earned the most wins as 🇵🇰 captain in T20Is 🌟#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/icwxayMGzw
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 22, 2022
बाबरचा साथी मोहम्मद रिझवान यानेही 51 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. बाबर- मोहम्मद रिझवान या जोडीने 3 चेंडू शिल्लक राखत 203 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर-रिझवानने रचला इतिहास! टी20च्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच सलामी जोडी
जेव्हा १५ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा
“आता त्याने तेच करावं”, भारतीय दिग्गजाचा रोहितला कानमंत्र