---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत पंत करणार पुनरागमन, मोठे अपडेट समोर

Gabba-Test-Rishabh-Pant
---Advertisement---

भारतीय संघ आगामी घरच्या भूमीवर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी या मालिकेसाठी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, उद्या म्हणजेच (9 सप्टेंबर) रोजी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे (Rishabh Pant) भारतीय संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.

क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते उद्या भारतीय संघाची घोषणा करू शकतात. भारतीय संघाच्या घोषणेची चाहत्यांना बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. काही दिवसापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते की, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यानंतर केली जाऊ शकते.

वास्तविक, भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेटमधून बाहेर आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत भारतीय संघासाठी एकही कसोटी सामना खेळू शकला नाही. मात्र, कसोटी सोडून पंतने वनडे आणि टी20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले आहे. आता चाहते कसोटीत त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत.

पंतच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 2018 मध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 33 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 43.67च्या सरासरीने 2,271 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये त्याने 11 अर्धशतकांसह 5 शतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 159 राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अश्विनसारखी गोलंदाजी शैली असलेल्या फिरकीपटूला बीसीसीआयनं धाडलं बोलावणं, कोण आहे तो?
वेस्ट इंडिजसहित 5 प्रमुख संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी क्वालिफाय करण्यात ठरले अयशस्वी
दुलीप ट्रॉफीतून खेळाडू किती पैसे कमावतात? विजेत्या आणि उपविजेत्यांच्या बक्षिस रकमेतही वाढ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---