पुणे । पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेसीठी झालेल्या लिलावात आर्णव पापरकर हा सर्वात महागडा खेळाडू खरला असून रायझिंग इगल्स् संघाने त्याला विकत घेतला आहे. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 29 जूनपासून सुरू हाणार आहे.
या लीगसाठी बीव्हीजी इंडियाचा पाठिंबा लाभला आहे. यामध्ये 6 संघांमध्ये 10, 12, 14 व 16 वयोगटाखालील एकुण 130 खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.
10 वर्षालील गाटत अर्णव पापरकरने 2300 गुण मिळवत सर्वात महागड्या खेळाडूचा मान मिळवला. देवांशी प्रभुदेसाई, अस्मि अडकर, अर्जुन गोहड, निल जोगळेकर हे खेळाडूही लिलावमध्ये सर्वाधीक महाग विकले गेले.
शहरात कुमार खेळाडूंसाठी ही पहिलीच ज्युनियर टेनिस लीग स्पर्धा होत असून या स्पर्धेच्या माध्यमातून या कुमार खेळाडूंना आपली गुणवत्ता व कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार आहे.
सालसा अहेर, ऋतुजा चाफळकर, गार्गी पवार, वौष्णवी अडकर, मानस धामणे यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंना या लीग स्पर्धेचा फायदा झाला आहे. यामुळे त्यांना आपले खेळाचे कौशल्य सुधारण्याची संधी मिळाली. असे पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले.
बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेचे आयुक्त कौस्तुभ शहा व पीएमडीटीएचे सचिव अभिषेक ताम्हाणे म्हणाले की, स्पर्धेमध्ये विविध टेनिस अकादमी व क्लब मधुन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. लिलावासाठी एकूण 300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता ज्यातून 6 संघांसाठी 130 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
लीगमध्ये 6 संघांसाठी 40 प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये टीईसीपीएसएल स्पीडिंग चिताज् – सुशिल देशमुख, पीईएसबी रोअरिंग लायन्स्- विक्रम देशमुख, टॅस पीसीटीए रेजिंग्ज् बुल्स- पार्थ चिवटे, पुणे ओपन स्ट्राईकिंग जॅगवार्स- नवनाथ शेटे, बाआयपीएल रायझिंग इगल्स्- समिर भांब्रे आणि मिलेनियम एकेटीए ग्रोवलिंग टायगर्स- आदित्य मडकेकर, कौफी यांचा सहभाग आहे.
स्पर्धेचे सह आयुक्त अश्विन गिरमे म्हणाले की, स्पर्धेत 10 वर्षाखालील गटाचा एकेरी सामना, 12 वर्षाखालील गटाचा एकेरी सामना. 14 वर्षाखालील मुले व मुली गटात एकेरी व ज्युनियर मिश्र दुहेरी(12 वर्षाखालील मुलगा व 14 वर्षाखालील मुलगी) 16 वर्षाखालील गटात मुले व मुलींचा एकेरी सामना आणि मिश्र दुहेरी सामना. सर्व सामने बेस्ट ऑफ 11 गेम(6 गेम मध्ये विजय) टायब्रेक 5 ऑल असे असणार आहेत. टायब्रेक विजेता संघ हा ज्या संघाने जास्तीत जास्त गेम जिंकल्या आहेत तो संघ विजेता घोषित करणार आहे.
बीव्हीजी इंडियाचे उपाध्यक्ष व पीएमडीटीएचे कार्यकारी सदस्य उमेश माने म्हणाले की, या स्पर्धेमुळे खेळाडूंमधील सर्वोत्तम गुण बाहेर येण्यास मदत होणार आहे. खेळाडूंना कमी वयात व्यावसायीक खेळाचा अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून घेता येणार आहे. तसेच खेळाडूंमध्ये आपला खेळ सुधारण्यासाठी अधिक कष्ट घेण्याची प्रेरणा निर्माण होईल. आशिवाय पुण्यातील टेनिस क्षेत्रात कौटुंबिक भावना निर्माण होण्यासाठी मदत होईल. बीव्हीजी इंडियाने सातारा मोगा पार्क या नविन फुड प्रोडक्टची सुरूवात केली आहे. जे सर्व खेळातील खेळाडूंसाठी अत्यंत लाभदायक आहे. स्पर्धेच्या पाठिंब्याशीवाय स्पर्धकांना बीव्हीजी कडून या प्रोडक्टचे गुडी बॅग दण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी योनेक्सचा बॉल पार्टनर तर इनर्झलचा स्पोर्टस् ट्रींग पार्टनर म्हणुन पाठिंबा लाभला आहे.
स्पर्धेतील संघातील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे
स्ट्राईकिंग जॅगवार्स– सुर्या काकडे, देव तुराखिया, विरेन चौधरी, सिया प्रसादे, धृवी अद्यंथाया, राघव अमिन, साईराज साळुंखे, अमोद सबनिस, सोहम सदावर्ते, देवेन चौधरी, पुर्वा भुजबळ, श्रियादेशपांडे, नमित मिश्रा, अर्जुन अभ्यंकर, अनर्घ गांगुली, अन्या जेकब, मधुरीमा सावंत, संज्योत, मुदशिंगीकर, अझफर मधानी, इंद्रजीत बोराडे, मृण्मयी भागवत.
स्पीडिंग चिताज्– आर्यन किर्तने, अर्चीत धुत, सक्षम भन्साळी, सुजय देशमुख, नमित हुड, देवांशी प्रभुदेसाई, रित्सा कोंडकर, पियुष जाधव, श्लोक गांधी, पार्थ देवरूखकर, अरूष मिश्रा, अदिती लाखे,आकांक्षा अग्निहोत्री, सुधांशू सावंत, अनमोल नागपुरे, जय पवार, श्रावणी खवले, वैष्णवी अडकर, आशी छाजेड, प्रसाद इंगळे, यशराज दळवी, स्नेहा रानडे.
रोअरिंग लायन्स्– कार्तिक शेवाळे, अर्जुन परदेशी, अमन शहा, काव्या देशमुख, अस्मी टिळेकर, वेदांत काळे, आदित्य भाटेवारा, अनन्मय उपाध्याय, आर्यन सुतार, अस्मी अडकर, श्रावणी देशमुख,इशान गोडभरले, जय दिक्षित, जैष्णव शिंदे, सिया देशमुख, रुमा गायकैवारी, सोनल पाटील, अथर्व अमरूळे, सिद्धार्थ जाडली, आर्या पाटील
रायझिंग इगल्स्– अभय नागराजन, निव कोठारी, अर्णव पापरकर, वैष्णवी सिंग, आहना कुलकर्णी, अदित्य राय, अव्दिक नाटेकर, केयुर म्हेत्रे, अर्णव बनसोडे, अलिना शेख, क्षिरीण वाकळकर, आर्यनदेवकर, निशित रहाने, दक्ष अगरवाल, रिया वाशिमकर, माही शिंदे, गौतमी खैरे, पारितोष पवार, ओम काकडे, मोहिनी घुले.
रेजिंग्ज् बुल्स– शार्दुल खवले, सनत काडले, अथर्व जोशी, प्रिशा शिंदे, मेहेक कपुर, अभिराम निलाखे, आर्यन शहा, तनय शहा, कृष्णा शिंगाडे, कौषिकी सामंता, चिन्मयी बागवे, शौर्य राडे, अर्णव कोकणे,अर्जुन गोहड, समिक्षा श्रोफ, रिजूल सिदनाळे, हरिता शंकरामन, सर्वेश बिरमाने, सेश्वर झंजोटे, हृदया शहा.
ग्रोवलिंग टायगर्स– समिहन देशमुख, दक्ष पाटील, मनन अगरवाल, मृणाल शेळके, अरोही देशमुख, अर्यन घाडगे, अर्जुन किर्तने, अरव मिश्रा, सनय सहानी, निल जोगळेकर, जुई काळे, प्राप्ती पाटील,इशान जिगाली, क्रिस नासा, वेद पवार, सिध्दार्थ मराठे, एंजल भाटिया, खुषी शर्मा, रिया भोसले, रोहन फुले, ओमकार अग्निहोत्री, मृणाल कुर्लेकर