मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कंपनीने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) असणाऱ्या पराग अग्रवाल यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पराग यांनी आपले शिक्षण आयआयटी बॉम्बे येथून पूर्ण केले आहे. गेली अनेक वर्षे ते अमेरिकेतील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करत आहेत.
ट्विटरचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांना क्रिकेटची खूप आवड आहे. ते भारत २०११ विश्वचषक विजयानंतर रस्त्यावर जल्लोष करण्यासाठी ते उतरले होते. त्यांच्या हातात तिरंगा सुद्धा होता. सोशल मीडियावर त्यांचा फोटो खूप व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये ते त्यांच्या मित्रांसोबत तिरंगा घेऊन विजय साजरा करताना दिसत आहेत. भारतीय संघाने २०११ ला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवलं होते. यापूर्वी भारताने १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला होता.
जॅक डोर्सीच्या राजीनाम्यानंतर पराग बनले सीईओ
जॅक डोर्सीने सीईओ पदाचा राजीनामा दिल्यानंतर कंपनीने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) असलेले पराग अग्रवाल ह्यांना सीईओ बनवण्याचा निर्णय घेतला. ३७ वर्षीय पराग हे जगातील टॉप ५०० कंपन्यांमधील सर्वात तरुण सीईओ आहेत. आईआईटी बॉम्बेमधून अभ्यास करून पराग यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट देखील मिळवली आहे. ट्विटरने त्यांना २०१८ मध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) बनवलं होतं. ट्विटर आधी पराग यांनीनी याहू, मायक्रोसॉफ्ट आणि एलएंडटी अश्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांसोबत काम केले आहे.