परभणी पांचाला प्राईड विरुद्ध लातूर विजयनगारा विर्स यांच्यात लढत झाली. दोन्ही संघाच्या साठी स्पर्धेतील शेवटची लढत असल्याकारणाने दोन्ही संघ विजयाने सांगता करण्यासाठी प्रयत्न करणार होते. परभणीच्या प्रसाद रुद्राक्ष ने चांगली सुरुवात केली मात्र लातूरच्या अजिंक्य काटले ने जबरदस्त खेळ करत सामन्यात चुरस आणली.
परभणीच्या प्रसाद रुद्राक्ष च्या चढाया नि तर राहुल घांडगेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर परभणी संघाने लातूरला ऑल आऊट करत सामन्यात आघाडी मिळवली. मध्यांतरला 26-15 अशी भक्कम आघाडी परभणी संघाकडे होती. त्यानंतर परभणी संघाने सामना एकतर्फी करत जिंकला.
परभणी पांचाला प्राईड संघाने 51-28 असा सामना जिंकत शेवट गोड केला. परभणी संघाकडून प्रसाद रुद्राक्ष ने चढाईत 18 गुण मिळवले. तर राहुल घांडगे ने अष्टपैलू खेळ करत 15 गुण मिळवले. तर लातुट कडून अजिंक्य ने काटले ने एकाकी 21 गुणांची खेळी केली. (Parbhani Panchala Pride team ends with victory in the tournament)
बेस्ट रेडर- अजिंक्य काटले, लातूर विजयनगारा विर्स
बेस्ट डिफेंडर्स- राहुल घांडगे, परभणी पांचाला प्राईड
कबड्डी का कमाल- अजिंक्य काटले, लातूर विजयनगारा विर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! दोन महिन्यांपूर्वीच पदार्पण केलेल्या खेळाडूची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, ठोकलेले एकमेव सामन्यात शतक
रायगड मराठा मार्वेल्स, पालघर काझीरंगा रहिनोस संघ प्ले-ऑफस मध्ये दाखल