ऍशेस मालिकेत (Ashes 2021-22) ऑस्ट्रेलिया संघाने अप्रतिम प्रदर्शन करून इंग्लंडला ४-० ने पराभूत केले. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना होबार्टमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी विजय मिळवला. मालिकेत विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाने ट्रॉफीसोबत विजयी जल्लोष केला. यावेळी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने असे काही केले, ज्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रमी त्याचे कौतुक करत आहे.
मालिकेतील विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघ जल्लोष करण्यासाठी स्टेजवर चढला होता. संघातील खेळाडू आनंदी होते आणि शँपेनच्या बाटल्यांसह जल्लोष करण्याच्या तयारीत होते. यावेळी संघातील प्रत्येक खेळाडू स्टेजवर उपस्थित होता, पण मालिकेत महत्वाचे फलंदाजी प्रदर्शन करणारा उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यावेळी लांब थांबला होता.
ख्वाजाचा थर्म इस्लाम आहे आणि त्यामुळे तो शँपेनपासून लांब थांबला होता. कर्णधार पॅट कमिन्सने जेव्हा त्याला लांब थांबलेले पाहिले, तेव्हा त्याने खेळाडूंना शँपेनच्या बाटल्या खाली ठेवायला लावल्या आणि त्याला आनंदात सामील होण्यासाठी पुढे बोलावले. यानंतर ख्वाजाही आनंदात खेळाडूंसोबत जल्लोष करण्यासाठी स्टेजवर गेला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
This might be a small gesture but this is what makes Pat Cummins great. He realised Khawaja had to dip because of the booze and rectifies it. pic.twitter.com/GNVsPGJhfK
— Fux League (@buttsey888) January 16, 2022
उस्मान ख्वाजाने ऍशेस मालिकेत ठोकली दोन शतके
दरम्यान, उस्मान ख्वाजाचे ऍशेस मालिकेतील प्रदर्शन दमदार राहिले. मागच्या मोठ्या काळापासून संघातून बाहेर राहिल्यानंतर ऍशेस मालिकतून त्याने संघात पुनरागमन केले. सिडनी कसोटीत त्याला पुनरागमनाची संधी मिळाली होती आणि या संधीचे त्याने सोने केले. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने १३७ तर दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावा केल्या होत्या.
This is how you make a minority feel welcome.
Respect for Pat Cummins, Travis head and the Australian team. pic.twitter.com/EgLDpmVxxx
— احمد غازي (@Ahmed_Brilliant) January 16, 2022
पॅट कमिन्स बनला सर्वोत्कृष्ट गोलंदाज
ऍशेस मालिकेत पहिल्यांदा पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली गेली होती आणि ती त्याने चांगल्या प्रकारे पार देखील पाडली. कमिन्सने मालिकेतील चार सामन्यात अवघ्या १८.०४ च्या सरासरीने सर्वाधिक २१ विकेट्स नावावर केल्या. या प्रदर्शनानंतर तो सलग तिसऱ्यांदा ऍशेस मालिकेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. मागच्या तीन ऍशेस मालिकेत त्याने एकूण ७३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याव्यतिरिक्त पदार्पणवीर स्कॉट बोलेंडने तीन सामन्यात तब्बल १८ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
‘…तू नव्या पिढीचा नेता’; पाकिस्तानी मित्राने विराटच्या राजीनाम्यानंतर केली भावनिक पोस्ट
धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’
व्हिडिओ पाहा –