fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस 2019 स्पर्धेत अर्जुन परदेशी, सक्षम भन्साळी, रिशीता पाटील, मृणाल शेळके यांची विजयी सलामी

पुणे। पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने 12 व 14 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात अर्जुन परदेशी, सक्षम भन्साळी, अथर्व जोशी, जयदीप तावरे यांनी, तर मुलींच्या गटात रिशीता पाटील, मृणाल शेळके, ध्रुवी आद्यथाया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात रिशीता पाटील हिने प्रेक्षा प्रांजलवर टायब्रेकमध्ये 6-5(3) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मृणाल शेळके व ध्रुवी आद्यथाया यांनी अनुक्रमे सारा हंदलगावकर व आरना लोढा यांचा 6-2 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली.

मुलांच्या गटात सक्षम भन्साळी याने निनाद पाटीलचा 6-1, असा तर अथर्व जोशीने तेज ओकचा 6-4 असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

पहिली फेरी: 12 वर्षाखालील मुले:

अवनीश गवळी वि.वि.मिहीर केळकर 6-3;
राज पारडा वि.वि.आरव गुप्ता 6-5(1);
अर्जुन परदेशी वि.वि.कपिल गढीयार 6-1;
अथर्व जोशी वि.वि.तेज ओक 6-4;
अनिकेत रॉय वि.वि.शुभांकर सिन्हा 6-1;
सक्षम भन्साळी वि.वि.निनाद पाटील 6-1;
जयदीप तावरे वि.वि.ईशान कदम 6-1;
वैष्णव रानवडे वि.वि.अनुज भागवत 6-1;

12 वर्षाखालील मुली:

मृणाल शेळके वि.वि.सारा हंदलगावकर 6-2;
रिशीता पाटील वि.वि.प्रेक्षा प्रांजल 6-5(3);
स्वरा कोल्हे वि.वि.आर्या बोराडे 6-0;
ध्रुवी आद्यथाया वि.वि.आरना लोढा 6-2.

You might also like