युरोपमधील ११ देशांत सुरू असलेला युरो कप २०२० हा केवळ मैदानावरील सामन्यांसाठीच नाहीतर, मैदानाबाहेरील घटनांसाठी गाजत आहे. हंगेरीविरुद्धच्या सामन्यापूर्वी ख्रिस्टियानो रोनाल्डोने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कोका-कोलाच्या बाटल्या हटवल्याच्या घटनेनंतर फ्रान्सचा प्रसिद्ध फुटबॉलपटू पॉल पोग्बा यानेही पत्रकार परिषदेत असेच काही केले. मंगळवारी (१५ जून) जर्मनीविरुद्धच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत ही घटना घडली.
पोग्बाने हटवली ती बाटली
मंगळवारी फ्रान्सने जर्मनीला युरो २०२० मधील आपल्या पहिल्या सामन्यात १-० ने पराभूत केल्यानंतर पोग्बा पत्रकार परिषदेत दाखल झाला. आल्याआल्या त्यालासमोरील टेबलावर हेनकेन बिअरची बाटली ठेवलेली दिसली. त्याने बसताक्षणी ती बाटली उचलून टेबलच्या खाली ठेवली. पोग्बा मुसलमान आहे. त्यामुळे तो अंमली पदार्थांचे सेवन करत नाही तसेच त्याचे समर्थनही करत नाही. स्पर्धेच्या प्रायोजकांबाबत असे कृत्य करणारा तो दुसरा खेळाडू आहे. पोग्बाने धार्मिक विश्वासांमुळे हेनकेनची बाटली बाजूला ठेवली. तर, रोनाल्डोने आरोग्याच्या कारणास्तव कोका-कोलाची बाटली टेबलवरून बाजूला केली होती. (Paul Pogba remove Heinken beer bottle video viral)
https://twitter.com/ViniJohny28/status/1404945476848336896
पोग्बाचा व्हिडिओ झाला व्हायरल
रोनाल्डोप्रमाणे पोग्बाचा हा व्हिडिओही ट्विटरवर व्हायरल होत आहे. काही लोक त्याची स्तुती करीत असताना, काही जण त्याच्यावर टीका करत आहेत. फ्रान्सच्या विजयाचा नायक ठरलेल्या पोग्बाला सामनावीर घोषित करण्यात आले होते. रोनाल्डोने हंगेरी विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत कोका-कोलाच्या काही बाटल्या पाहिल्यानंतर त्यांना कॅमेर्याच्या अँगलवरून पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्याने पाण्याची बाटली उचलली आणि सर्वांना ‘पाणी पिण्यास’ सांगितले.
रोनाल्डोच्या या छोट्या कृत्याने शेअर बाजारात कंपनीविरूद्ध वातावरण निर्माण झाले आणि त्याचा परिणाम कंपनीच्या किंमतीवर झाला. अल्पावधीतच कोका कोलाचा शेअर ५५.२२ डॉलर्सपर्यंत घसरला आणि यामुळे कोका कोला कंपनीला एका दिवसात ४ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे २९,३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले.
महत्त्वाच्या बातम्या –
वयाच्या ३२ व्या वर्षी दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला ‘हा’ गोलंदाज
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
आयसीसीने केले विराटच्या एक्सप्रेशन्सचे फोटो शेअर; नेटकऱ्यांनी ट्विटरवर अशाप्रकारे उडवली थट्टा