Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पय्याडेचा ग्लोरियस विजय, राजावाडीसह फोर्ट यंगस्टर्स, स्पोर्टस्फिल्ड, पय्याडे उपांत्य फेरीत

पय्याडेचा ग्लोरियस विजय, राजावाडीसह फोर्ट यंगस्टर्स, स्पोर्टस्फिल्ड, पय्याडे उपांत्य फेरीत

February 16, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
File Photo

File Photo


मुंबई, दि. १६ (क्री.प्र.)- रिद्धी ठक्करच्या प्रभावी फिरकीपुढे ग्लोरियस क्रिकेट क्लबचा अवघा संघ ७० धावांत गारद झाला आणि पय्याडे स्पोर्टस् क्लबने विजयी लक्ष्य २ फलंदाजांच्या मोबदल्यात ६.४ षटकांतच गाठले आणि माहीम ज्युवेनाईल स्पोर्टस् क्लबच्या प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच राजावाडी, फोर्ट यंगस्टर्स आणि स्पोर्टस्फिल्ड यांनी अंतिम चार संघांत स्थान मिळविले. आता शुक्रवारी उपांत्य फेरीत पय्याडे विरुद्ध स्पोर्टस्फिल्ड तर फोर्ट यंगस्टर विरुद्ध राजावाडी अशा लढती रंगतील.

शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पय्याडेच्या रिद्धी ठक्करच्या फिरकीसमोर ग्लोरियसचा डाव रंगूच शकला नाही. रिद्धीने आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून ग्लोरियसचे कंबरडे मोडले. परिणामता त्यांचा डाव ७० धावांतच आटोपला. पय्याडेच्या खुशी भाटिया (२२) आणि सलोनी कुष्टे (ना. ३६) यांनी ६४ धावांची घणाघाती सलामी देत मोठ्या थाटात उपांत्य फेरी गाठली. रिद्धी पय्याडेच्या विजयाची शिल्पकार ठरली.

दुसर्‍या उपांत्यपूर्व लढतीत राजावाडी क्रिकेट क्लबने वृषाली भगतच्या ३७ चेंडूतील ६२ धावांच्या जोरावर ६ बाद १३४ अशी दमदार मजल मारली. प्रत्युत्तरादाखल गौड युनियन स्पोर्टस् क्लबचा संघ २० षटकांत ७ बाद ८४ धावांपर्यंतच पोहचू शकला. राजावाडीच्या सेजल राऊतने ७ धावांत ३ विकेट मिळविल्या. गौड युनियनकडून चेतना बिश्तने आणि निर्मिती राणे या दोघींनी प्रत्येकी २७ धावा केल्या. या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडूचा मान वृषाली भगतला मिळाला.

अन्य उपांत्यपूर्व लढतीत फोर्ट यंगस्टर्स , विरारने पालघर-डहाणू तालुका स्पोर्टस असोसिएशनचा ७ विकेटनी पराभव केला. पालघर-डहाणू संघाने ८ बाद ९८ धावा केल्या तर फोर्ट यंगस्टर्सने मानसी पाटील (२६) आणि झिल डिमेलो (३९) यांच्या फलंदाजीच्या जोरावर २० चेंडू आणि ७ विकेटनी विजय नोंदविला. तसेच स्पोर्टस् फिल्डने दहिसर स्पोर्टस् क्लबचा ३९ धावानी पराभव करीत उपांत्य फेरीत स्थान मिळविले.

संक्षिप्त धावफलक-
ग्लोरियस सीसी : १८.३ षटकांत सर्वबाद ७० ( इरा जाधव १०, जया नेगी १०; रिद्धी ठक्कर ४-०-१२-३, श्रद्धा सिंग ४-०-१०-२, रिद्धी कोटेचा २-०-११-२) पराभूत वि. पय्याडे एससी : ६.४ षटकांत २ बाद ७१ (खुशी भाटिया २२, सलोनी कुष्टे ३६ ; सिद्धी पवार १-०-२३-१)

राजावाडी सीसी : २० षटकांत ६ बाद १३४ (वृषाली भगत ना. ६२, सायली सातघरे १२, धनश्री वाघमारे २५, निविया आंब्रे १३; अक्षी गुरव ४-०-२४-२) वि. वि. गौड युनियन सीसी : २० षटकांत ७ बाद ८४ ( तनिषा गायकवाड १३, चेतना बिश्त २७, निर्मिती राणे २७ ; सेजल राऊत ४-०-७-३, वृषाली भगत १-०-१३-१)

पालघर-डहाणू तालुका एसए : २० षटकांत ८ बाद ९८ ( ययाती गावड २३, अश्विनी निशाद २७ ; बातुल परेरा ४-०-१४-२, झिल डिमेलो ३-०-१५-१) पराभूत वि. फोर्ट यंगस्टर्स (विरार) : १६.४ षटकांत ३ बाद ९९ ( मानसी पाटील २६, झिल डिमेलो ३९ ; ययाती गावड ४-०-२७-२, शुभ्रा राऊत ३-१-१५-१)

स्पोर्टस् फिल्ड सीसी : २० षटकांत ५ बाद १२९ ( शाहीन अब्दुल्ला २२, फातिमा जाफर २९, श्वेता कलपती २५ ; प्रिया मिसाळ ४-०-२१-२, सौम्या सिंग ३-०-१६-१) विजयी वि. दहिसर स्पोर्टस् क्लब : १९.१ षटकांत सर्वबाद ९० (निधी घरत ३२ ; पालक धरमशी ३.१-०-२४-१, फातिमा जाफर ३-०-८-२)

फोटो ओळ- पय्याडे स्पोर्टस् क्लबच्या विजयात मोलाची कामगिरी करणार्‍या रिद्धी ठक्करला विजयाचे शिल्पकार म्हणून पुरस्कार देताना ज्येष्ठ क्रिकेटपटू विजू ठाकूर आणि ज्येष्ठ क्रिकेट पंच सुरेंद्र बाबरेकर (Payyade’s Glorious Victory, Fort Youngsters vs. Rajawadi, Sportsfield, Payyade in Semi-Finals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

बुमराहपाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज हॉस्पिटलमध्ये! सहा महिने क्रिकेटपासून राहणार दूर
दुसऱ्या कसोटीआधी स्वतः एलन बॉर्डर यांनी निवडली प्लेइंग 11, मॅच विनर खेळाडू संघाबाहेर


Next Post
Photo Courtesy: Twitter/Bharat Sundarsen

हे काहीतरी नवीनच! दिल्ली कसोटीआधी स्मिथ-लॅब्युशेनची 'स्पेशल प्रॅक्टिस', छायाचित्रे व्हायरल

South-Africa

BREAKING: अवघ्या 30 व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, नुकतीच गाजवलेली एसए टी20 लीग

Rahul dravid

'तुम्ही 6 फुट 5 इंच उंचीचा गोलंदाज घेऊन या', राहुल द्रविड यांची चक्क पत्रकाराकडे मागणी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143