पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांनी केलेल्या आरोपांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी फ्लॉवर यांनी खुलासा केला होता की २०१६ मध्ये पाकिस्तानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ब्रिस्बेन येथे नाश्त्यावेळी फ्लॉवर फलंदाजीबद्दल सल्ला देत असताना युनुस खानने त्यांच्या गळ्याला चाकू लावला होता.
२०१४ ते २०१९ पर्यंत पाकिस्तानचे प्रशिक्षक राहिलेल्या ग्रँट यांनी ‘फॉलोइंग ऑन क्रिकेट’ पॉडकास्टवर आपला भाऊ अँडी आणि होस्ट नील मॅन्थॉर्प यांच्याशी संभाषण करताना याबद्दल खुलासा केला होता.
या प्रकरणाबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी पीटीआयला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सुत्राने सांगितले की ही एक मैत्रीपूर्ण मस्ती होती. ते म्हणाले, ‘ग्रँट फ्लॉवर यांच्या भाष्यामुळे जी छाप उमटली आहे ती पूर्णपणे सत्य नाही. युनुसने गमतीने बटर लावण्यासाठी असणारा चाकू उचलला होता आणि ग्रँट यांना म्हणाला होता की त्याला आधी नाश्ता करु दे. नाश्त्याच्या वेळेला कोणताही सल्ला देऊ नको.’
पण अजून यावर युनुस खानने कोणतेही प्रतिक्रिया दिली नसली तरी सुत्रांनी म्हटले आहे की प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ त्यांचा करार संपल्यानंतर गोपनिय माहिती अशाप्रकारे सार्वजनिक करतात, हे पाहून वाईट वाटले. तसेच ते मीठ-मसाला लावून गोष्टी सांगतात, ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळेल.
त्याचबरोबर पाकिस्तानचे मीडिया मॅनेजर यांनी आत्ता या विषयावर कोणतीही कमेंट केली जाणार नसल्याचे सांगितले आहे.
सध्या युनुस पाकिस्तान क्रिकेट संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याने 2017 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो पाकिस्तानकडून कसोटीत 10 हजारांहून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
जेव्हा ‘या’ क्रिकेटपटूने लावला होता प्रशिक्षकाच्याच गळ्याला चाकू
इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची प्रकृती ढासळली, पहिल्या कसोटी सामन्यातून…
क्रिकेटर असूनही मला आतंकवाद्यांच्या सेलमध्ये १६-१७ तास ‘ते’ करत होते टॉर्चर