भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट विश्वचषक व क्रिकेट मालिकांमध्ये बाबत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषक यामध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. अशात आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष नजम सेठी यांनी उभय संघात तटस्थ ठिकाणी कसोटी मालिका खेळण्याचा प्रस्ताव दिलेला. तो प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धुडकावल्याचे वृत्त आहे.
काही पाकिस्तानी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, पीसीबी भारतीय संघाविरुद्ध तटस्थ ठिकाणी कसोटी मालिका खेळण्याचा विचार करत आहे. पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी याबाबतचा प्रस्ताव बीसीसीआयला दिला आहे. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाने असा कोणताही प्रस्ताव स्वीकारलेला नसून, सध्या पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही प्रकारची मालिका खेळण्याचा विचार नाही.
सेठी यांनी या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अथवा दक्षिण आफ्रिका ही स्थळे सुचवली होती. त्यांनी आपले वजन इंग्लंडच्या पारड्यात टाकलेले.
सध्या पीसीबी व बीसीसीआय समोरासमोर आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये नियोजित आशिया चषकासाठी भारतीय संघाने पाकिस्तानात यावे अशी पीसीबीने इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात न आल्यास पाकिस्तान संघ विश्वचषकात सहभागी होणार नाही अशी धमकी पीसीबीने आयसीसीला दिली आहे. आशिया चषक ऑगस्ट महिन्यात तर विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर खेळला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 2013 नंतर कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेले नाही. त्यावेळी पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आलेला. तर, भारतीय संघाने अखेरच्या वेळी 2005-2006 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. तेव्हापासून उभय संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात.
(PCB Propose India Pakistan Test Series At Neutral Venue BCCI Denied)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्ले ऑफ्सची रेस रंगात! पुन्हा भिडणार मुंबई-सीएसके? जाणून घ्या समीकरणे
चाहत्यांनी विराट..विराट म्हणून डिवचल्यानंतर अशी होती नवीन उल हकची रिऍक्शन, पाहा व्हिडिओ