भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. मागील जवळपास सहा महिन्यांपासून उभय बोर्डांमध्ये आशिया चषक व वनडे विश्वचषक यांच्यातील सहभागामुळे रणकंदन सुरू होते. त्यानंतर आशिया चषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय नुकताच झाला. यामध्ये श्रीलंका व पाकिस्तान संयुक्तरित्या स्पर्धेचे आयोजन करतील. असे असतानाच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीने भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात सहभागी होण्याविषयी पुन्हा एकदा साशंक भूमिका घेतली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे द्विपक्षीय क्रिकेट होत नाही. हे दोन्ही संघ केवळ एसीसी व आयसीसीच्या स्पर्धांमध्ये समोरासमोर येतात. दोन्ही देशातील राजकीय तणाव पाहता भविष्यातही हे दोन्ही संघ एकमेकांच्या देशात खेळण्याची शक्यता कमी आहे.
याच मुद्द्याला धरून आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे विश्वचषकासाठी यायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय पाकिस्तान सरकार घेईल असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आयसीसीला आपण विश्वचषकासाठी संघ पाठवणार असल्याचे म्हटलेले. केवळ पाकिस्तान बोर्डाचे काही सदस्य आधी भारतात जाऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतील अशी एकच अट त्यांनी ठेवली होती. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा नवा मुद्दा उपस्थित करत विश्वचषक आयोजनाबाबत आयसीसी व बीसीसीआयला बॅकफुटवर ढकलले आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तान आपले बहुतांशी सामने कोलकाता व चेन्नई येथे खेळू शकते. तर, भारत पाकिस्तान यांच्यातील महत्त्वाचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. आता या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआय कशी भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(PCB Said Pakistan Government Will Take Last Decision Of Pakistan Cricket Team Entry In ODI World Cup In India)
महत्वाच्या बातम्या-
WTC ट्रॉफी गमावल्यानंतर लंडनमध्ये पत्नी अनुष्कासह भजन ऐकायला गेला विराट, फोटोही जोरदार व्हायरल
संतापलेल्या आफ्रिदीचा पीसीबीला घरचा आहेर; अहमदाबाद खेळपट्टीविषयी म्हणाला, ‘तिथं काय आगीचा पाऊस पडतोय?’