मंगळवारी (31 डिसेंबर) ऍडलेड येथे बिग बॅश लिगमधील (Big Bash League) सिडनी थंडर्स (Sydney Thunders) आणि ऍडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) या संघात ट्वेंटी-20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पिटर सिडलने (Peter Siddle) ‘धोनी स्टाईल’ (Dhoni Style) मध्ये फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न केला आहे.
या सामन्यात मंगळवारी एका क्षणी सिडल स्टंपच्या पुढे होता, त्यावेळी फलंदाजाला धावबाद करण्यासाठी त्याने स्टंपकडे न पाहता चेंडू थेट स्टंपच्या दिशेने फेकला. त्यामुळे फलंदाज उस्मान ख्वाजा बाद झाला.
सिडलची ही कृती पाहुन अनेकांना भारताचा यष्टीरक्षक एमएस धोनीची आठवण झाली. धोनीने अनेकदा अशा प्रकारे फलंदाजांना धावबाद केले आहे.
ऍडलेड स्ट्राईकर्सकडून खेळणार्या सिडलने 14 व्या षटकात स्टंपकडे न पाहता 50 चेंडूत 63 धावा करणाऱ्या सिडनी थंडर्सचा फलंदाज उस्मान ख्वाजाला (Usman Khawaja) धावबाद करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.
P SIDDY STOP IT!
That's the cheekiest of cheeky run outs from the Strikers veteran! Khawaja out for 63 #BBL09 pic.twitter.com/28SuiDxRcL
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2019
या सामन्यात सिडलने 4 षटकात 30 धावा देत 2 विकेट्स घेतले आणि सिडनी थंडर्सचा डाव 168 धावांवर संपुष्टात आणला. ख्वाजा बाद झाल्यानंतर सिडनीचा कर्णधार कॅलम फर्ग्यूसनने अर्धशतक पूर्ण करताना (Callum Ferguson) सर्वाधिक 73 धावा केल्या.
तसेच या सामन्यात 169 धावांचा पाठलाग करताना ऍडलेड संघाला निर्धारित 20 षटकात 9 बाद 165 धावाच करता आल्याने केवळ 3 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
सिडलने रविवारी (29 डिसेंबर) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने 67 कसोटी सामन्यात 30.66 च्या सरासरीने 221 विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने एका डावात 8 वेळा 5 विकेट्स घेतले आहेत. सिडल हा ऑस्ट्रेलियाचा 13 वा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
मयंक अगरवाल म्हणतो, ही द्विशतकी खेळी खास!
वाचा- ????https://t.co/zo9veMFsUB????#म #मराठी #Cricket #TeamIndia @mayankcricket— Maha Sports (@Maha_Sports) January 1, 2020
एमएस धोनीचा हा फोटो होतोय जोरदार व्हायरल…
वाचा????https://t.co/gshroRW5CR????#Cricket #MSDhoni #म #मराठी @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) January 1, 2020