खेलो इंडिया युथ गेम्स; मुलींच्या हॉकीत महाराष्ट्राला ब्रॉंझपदक

गुवाहाटी । खेलो इंडिया युथ गेम्सच्या अखेरच्या टप्प्यात मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला ब्राँझपदकाची कमाई झाली. उत्कंठापूर्ण लढतीत त्यांनी मिझोराम संघावर १-० अशी मात केली. उत्तरार्धात पाचव्या मिनिटाला पूजा शेंडगे हिने केलेल्या अप्रतिम गोलच्या जोरावरच महाराष्ट्राला हे यश मिळविता आले.

Related Posts

या सामन्यात मिझोरामच्या खेळाडूंनी महाराष्ट्राला जोरदार झुंज दिली. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच होता. उत्तरार्धाच्या प्रारंभापासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे मिझोरामच्या बचाव फळीतील खेळाडूंवर दडपण आले. त्याचा फायदा घेत पूजाने खणखणीत फटका मारुन चेंडू गोलात मारला.

हा गोल झाल्यानंतर मिझोरामच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांना एक पेनल्टी कॉर्नरही मिळाला. तथापि महाराष्ट्राची गोलरक्षक सुस्मिता पाटील हिने नेत्रदीपक गोलरक्षण केले तसेच बचाव फळीतील खेळाडूंनी मिझोरामच्या खेळाडूंना गोलापासून वंचित ठेवले. महाराष्ट्रालाही दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र त्याचा लाभ घेण्यात त्यांना यश मिळाले नाही.

You might also like