इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुरुवारी (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ भिडले. यामध्ये आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. आरसीबीच्या विजयाचा नायक शतकवीर विराट कोहली हा ठरला. आरसीबीच्या या विजयानंतर आता प्ले ऑफ्ससाठीची रंगत चांगलीच वाढली आहे. साखळी फेरीतील केवळ पाच सामने शिल्लक असताना, अजूनही तीन संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरण्याचे बाकी आहेत.
आरसीबीने या सामन्यात विजय मिळवल्यानंतर ते प्रथमच पहिल्या चारमध्ये सामील झाले आहेत. त्यांचा नेट रनरेटही अधिक आहे. आरसीबीच्या विजयाचे सर्वाधिक नुकसान मुंबई इंडियन्सला होऊ शकते. कारण, आता दोन्ही संघांचे समान गुण असून दोन्ही संघांना अखेरचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दोन्ही संघ पराभूत झाले तरी, सरस धावसंख्येच्या जोरावर आरसीबी पुढे जाईल. मात्र मुंबईने आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले आणि आरसीबीला गुजरातकडून पराभूत व्हावे लागले तर, मुंबई पुढच्या फेरीत दाखल होईल. त्यामुळे मुंबईला आपल्या विजयासाठी प्रयत्न केल्यानंतर, आरसीबीच्या पराभवाची प्रार्थना करावी लागणार आहे.
गुजरात टायटन्स संघ यापूर्वीच प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. ते क्वालिफायर खेळतील. याव्यतिरिक्त लखनऊ सुपरजायंट्स व चेन्नई सुपर किंग्स हे संघदेखील प्ले ऑफ शर्यतीत धावताना दिसतात. या दोन्ही संघांना देखील विजय अनिवार्य असेल. चेन्नई व लखनऊ आपापले सामने पराभूत झाले आणि मुंबई व आरसीबीने आपले सामने जिंकले, तर सरस धावगतीच्या जोरावर चेन्नईला पुढे जाण्याची संधी असेल. मात्र, लखनऊ, मुंबई व आरसीबीने विजय मिळवल्यास चेन्नईचे आव्हान संपुष्टात येईल.
या व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्सला प्ले ऑफमध्ये जाण्याची अगदी किंचितशी संधी दिसते. त्यांना शुक्रवारी (19 मे) पंजाबला मोठ्या अंतराने पराभूत करून, मुंबई व आरसीबी यांच्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल.
(Play Offs Equation For IPL 2023 Of Last Phase)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्वतःशीस स्पर्धा करतोय फाफ डू प्लेसिस! हंगामात 650 धावा पूर्ण, नावावर केला नवा विक्रम
‘सगळ्यांकडून शिकायचं आहे, पण अनुकरण नाही’, लखनऊचा कर्णधार कृणालची प्रतिक्रिया चर्चेत