पुणे। दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांडो कराटे स्पर्धेत निरेतील आयडियल तायक्वांदो कराटे किकबॉक्सिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत 2 सुवर्ण, 4 रौप्य व 7 कांस्य पदक पटकवले. या स्पर्धेमध्ये नेपाळ, भुटान, बांगलादेश, श्रीलंका, जम्मु काश्मीर अशा विविध देशांतील १५४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे मिळवलेले अभूतपूर्व यश हे कोण्या एका खेळाडूचे नसून संपूर्ण केकेबी फॅमिलीचे आहे. त्यामुळे केकेबी फॅमिलीचे सर्वांनी अभिनंदन केले.
सदर स्पर्धेत स्वराली खताळ, सुर्या शिंदे यांनी सुवर्ण पदक, सई शहा, अंकिता जगदाळे, निलोफर इनामदार, यश कापरे यांनी रौप्य पदक, तर नेहा आलगुर, ऐश्वर्या पाध्ये, वैष्णवी पवार, ज्ञानेश्वरी रणवरे, करण चव्हाण, उमंग अग्रवाल, अभिषेक लकडे यांनी कास्य पदक मिळवून निरा गावासह महाराष्ट्रचे नावही मोठे केले.
या स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करणारे केकेबीचे मास्टर संजय सोनवणे, प्रशिक्षक केकेबीचे चीफ इन्स्ट्रक्टर अजित सोनवणे, सिनियर इन्स्ट्रक्टर प्रज्वल निगडे, ओंकार खलाटे आदींचे सहकार्य लाभले.