येत्या एप्रिल महिन्यापासून, जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या लीगची आतुरतेने वाट पाहत असतात. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू सहभाग घेत असतात.तसेच येत्या १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावात एकूण २९२ खेळाडू आपले नशिब आजमावून पाहणार आहेत.
१४ व्या सत्रात संघ नवीन नावासह करणार प्रवेश
गेल्या १३ सत्रांपासून किंग्स इलेवेन पंजाब नावाने ओळखला जाणारा संघ, यंदा १४ व्या सत्रात नवीन नावासह स्पर्धेत प्रवेश करणार आहे. यंदा किंग्स इलेवेन पंजाब संघाचे नाव ‘ पंजाब किंग्स ‘ असे असणार आहे. यंदा ही संघाचा कर्णधार केएल राहुलच असणार आहे. तर अनिल कुंबळे संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पडणार आहेत. पंजाब संघाकडे लिलावात बोली लावण्यासाठी एकूण ५३ करोड रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहेत. आयपीएलच्या १४ व्या मोसमासाठी लिलावात उतरणाऱ्या संघांपैकी सर्वाधिक रक्कम पंजाबकडे आहे.
या खेळाडूंवर लागु शकते बोली
पंजाब संघाकडे आयपीएलचे एकही विजेतेपद नाही. यंदा त्यांच्याकडे चांगली संघबांधणी करुन विजेदेपद जिंकण्याची चांगली संधी आहे. पंजाबकडे बोली लावण्यासाठी एकूण ५३ करोड पेक्षा जास्त रक्कम आहे आणि ९ खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे. यात त्यांना ५ परदेशी खेळाडूंना संघात समाविष्ट करण्याची संधी आहे.
तसेच मध्यक्रमातील कमतरता भरून काढण्यासाठी पंजाब संघ लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेन सारख्या एखाद्या खेळाडूवर बोली लावू शकतात. तसेच ग्लेन मॅक्सवेल याला संघातून काढण्यात आले आहेत. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मोईन अली किंवा शाकीब अल हसन हे दोघेही चांगला विकल्प ठरू शकतील.
अनुभवी खेळाडू असताना देखील प्लेऑफ गाठण्यास अयशस्वी
किंग्स इलेवेन पंजाब संघाकडे केएल राहुल, मयंक अगरवाल, क्रिस गेल, मोहम्मद शमी आणि निकोलस पुरण यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. परंतु, गेल्या सत्रात, संघात मध्यक्रम आणि जलद गोलंदाजांची कमतरता भासून आली. याच कारणास्तव पंजाब संघ प्लेऑफमध्ये पोहोचला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
धक्कादायक!! चालू क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना
विशेष लेख: खरंच गेल्या १३ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
उत्तम यष्टिरक्षक होण्यासाठी पंतला ‘ही’ गोष्ट करावी लागेल, दिग्गजाने दिला सल्ला