भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २० जून २०११ रोजी कसोटीमध्ये पदार्पण केले. वेस्टइंडीज विरुद्ध किंग्स्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यातून त्याने हे पदार्पण (Test Debut) केले होते. कसोटीच्या पदार्पणावेळी खेळलेल्या दोन्ही डावांत विराटला ४ आणि १५ अशा धावा करता आल्या होत्या. आज त्याच विराट कोहलीने १०० कसोटी सामने आपल्या नावावर करत अनेक दिग्गज खेळाडूंच्या यादीत आपलं नाव जोडलं आहे.
नुकताच भारत आणि श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) पार पडलेला मोहाली कसोटी सामना (IND VS SL) विराट कोहलीचा (Virat Kohli) कारकिर्दीतील १०० वी कसोटी (100th Test) सामना होता. तो १०० कसोटी खेळणारा भारताचा १२ वा, तर जगातील ७१ वा खेळाडू ठरला.
विशेष म्हणजे एकीकडे विराटने १०० कसोटी सामने पूर्ण केले आहेत, तर दुसरीकडे विराटसोबतच आणखी दोन खेळाडूंनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते परंतु, त्यांना तितकस यश मिळालं नाही. भारताचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार आणि तामिळनाडूचा उत्कृष्ट सलामी फलंदाज अभिनव मुकुंद या दोन खेळाडूंनीही विराटसोबत २०११ मध्ये किंग्स्टन कसोटीत पदार्पण केले होते. या लेखातून आपण आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
प्रवीण कुमार
प्रवीण कुमार (Praveen Kumar) मर्यादित षटकांमध्ये दीर्घकाळ खेळला असला, तरी त्याला फक्त ६ कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाली. त्या ६ कसोटी सामन्यांमध्ये त्याने २७ विकेट्स घेतल्या आहेत. चेंडू स्विंग करण्याची कला असूनही प्रवीणला दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीत तितकसं यश मिळालं नाही. त्याने ६८ वनडे सामने खेळले असून ७७ विकेट्स घेतल्या, तसेच १० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये त्याने ८ विकेट्स घेतल्या.
अभिनव मुकुंद
अभिनव मुकुंदने (Abhinav Mukund) ७ कसोटी सामन्यात ३२० धावा केल्या आहेत. सुरवातीच्या चार कसोटी सामन्यानंतर मुकुंदने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले होते. पण नंतर तो संघातून बाहेर झाला. मात्र, त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि भारत अ संघाकडून शानदार कामगिरी केली. अखेर त्याने २०१७ मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. पण २०१७ साली देखील तो २ सामनेच खेळू शकला. श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या कसोटी डावात मुकुंदने ८१ धावा केल्या होत्या. पण नंतर त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही आणि तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर गेला.
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानात ७१ वे शतक ठोकणार विराट कोहली? पोस्टर अन् बॅनर घेऊन चाहते रावळपिंडी कसोटीत हजर
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिसणार का एबी डिविलियर्स? सर्वत्र रंगलीय चर्चा
च्युइंग गम चावत अन् विना हेल्मेट फलंदाजी करायचे रिचर्ड्स; मैदानावर उतरताच गोलंदाजांना फुटायचा घाम