जगभरातील कित्येक क्रिकेट स्पर्धांच्या गर्दीतही इंडियन प्रीमियर लीगने वेगळीच प्रसिद्धी मिळवली आहे. चिक्कार पैसा, वेगवेगळ्या देशातील खेळाडूंची सहभाग, दिग्गज आणि युवा खेळाडूंचे अतुलनीय प्रदर्शन, खेळाडूंना मिळणारी प्रसिद्धी अशा अनेक गोष्टींनी आयपीएलची प्रतिष्ठा वाढवण्यात योगदान दिले आहे.
त्यामुळे या प्रतिष्ठित टी२० लीगमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी खेळाडू जिवाचे रान करताना दिसतात. अनेक खेळाडू तर पहिल्या हंगामापासून ते १२व्या हंगामापर्यंत आयपीएलचा भाग होते. परंतु आयपीएल २०२०च्या लिलावात काही खेळाडूंना त्यांच्या प्रदर्शनामुळे, वयामुळे किंवा इतर काही कारणांमुळे कोणत्याही संघाने विकत घेतले नाही किंवा त्यांना खेळण्याची संधी अजूनपर्यंत मिळाली नाही. तर काही खेळाडूंना संघात संधी मिळूनही त्यांनी आयपीएल २०२०ची सुरुवात होण्यापुर्वी वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली.
सुरेश रैना व हरभजन सिंगने स्पर्धेतून वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली आहे. धवल कुलकर्णी मुंबई इंडियन्सचा भाग असून त्याला १३व्या हंगामात संघाने अजूनतरी संधी दिली नाही.
त्यामुळे तब्बल १२ हंगाम आयपीएलमध्ये खेळलेले ते खेळाडू, यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा भाग नाहीत. आम्ही त्याच खेळाडूंची यादी इथे दिली आहे. पार्थिव पटेल रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचा भाग असून त्यालाही अजून एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. तर युसूफ पठाण आय़पीएल लिलावात अनसोल्ड राहिला.
आयपीएलमध्ये पहिले १२ हंगाम खेळलेले परंतू २०२० हंगामात संधी न मिळालेले खेळाडू-
पार्थिव पटेल, सुरेश रैना, यूसुफ पठान, हरभजन सिंग, धवल कुलकर्णी
महत्त्वाच्या बातम्या-
आमचं नाव तेव्हाही आणि आताही.! पाहा आयपीएलचा पहिला आणि तेरावा हंगाम खेळणारे ‘महारथी’
खबरदार! मिस्टर ३६० च्या हेल्मेटवर चेंडू माराल, तर…
मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाने केली केदार जाधवच्या गोलंदाजीची नक्कल, फोटो होतोय व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
असा भारतीय खेळाडू ज्याने पाकिस्तानच्या खेळाडूंना आणले होते रडकुंडी
जाणून घ्या आयपीएलमधील सर्व संघाच्या प्रशिक्षकांचा पगार, मुंबईच्या प्रशिक्षकाला मिळतोय…
क्या बात है! २००८ पासून आजपर्यंत ‘ते’ खेळत आहेत आयपीएल, हा विदेशी खेळाडूही यादीत