इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या ३२ व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्स संघ चांगली कामगिरी करून स्पर्धेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. परंतु संघातील काही खेळाडूंना स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे प्लेइंग इलेव्हेनमध्ये कुठल्या खेळाडूंना संधी द्यावी? हा प्रश्न केएल राहुल समोर उपस्थित झाला असेल. चला तर जाणून घेऊया, कशी असेल पंजाब किंग्स संघाची संभावित प्लेइंग ईलेव्हन?
आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्स संघातील खेळाडू डेविड मलान, झाय रिचर्ड्सन आणि रिले मेरेडिथ यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर पंजाब किंग्स संघांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतु या खेळाडूंच्या ऐवजी आदिल रशिद, नाथन एलिस आणि एडेन मार्करमला संधी दिली आहे. हे तिघेही खेळाडू सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे पंजाब किंग्स संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुठल्या खेळाडूंना संधी दिली जाईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि मयंक अगरवाल हे दोघेही सलामीवीर फलंदाजांची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात. तर स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अप्रतिम फलंदाजी करणाऱ्या शाहरुख खानला देखील या संघात संधी देण्यात येऊ शकते. यासह तर ख्रिस गेल आणि निकोलस पुरन हे वेस्ट इंडिजचे खेळाडू विस्फोटक फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. तसेच फेबीअन एलेन आणि मोईसिस हेनरिक्स हे दोघेही अष्टपैलू खेळाडूंची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतात.
या गोलंदाजांना मिळू शकते संधी
पंजाब किंग्स संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंगला या संघात वेगवान गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. तसेच ख्रिस जॉर्डनला देखील या संघात स्थान दिले जाऊ शकते. यासह फिरकी गोलंदाज म्हणून रवी बिश्नोई आणि हरप्रित बरार या दोन्ही गोलंदाजांमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. तसेच टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या नाथन एलिसलाही पदार्पणाची वाट पाहावी लागू शकते.
अशी असेल पंजाब किंग्स संघाची प्लेइंग ईलेव्हन
केएल राहुल (कर्णधार,यष्टिरक्षक), मयंक अगरवाल, ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पुरन, शाहरुख खान, फेबीअन एलेन, रवि बिश्नोई, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित उतरणार राजस्थान रॉयल्स, पाहा संजूच्या संघाची ‘संभाव्य प्लेइंग इलेव्हन’
सचिनच्या लेकीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, टायगर श्रॉफच्या बहिणीनेही केली कमेंट