मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी एक रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. एकीकडे युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ तर दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्स संघ आमने सामने असणार आहेत. हे दोन्ही संघ हा सामना जिंकून गुणतालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.
परंतु राजस्थान रॉयल्स संघाला स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या संघातील मुख्य खेळाडू जोफ्रा आर्चर, जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या संघाच्या प्लेइंग इलेव्हेनमध्ये कोणाला संधी दिली जाईल? चला तर जाणून घेऊया कोण असतील ते अकरा खेळाडू, ज्यांना मिळेल पंजाब किंग्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्याची संधी.
राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात एकूण ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. तर ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. जर या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर त्यांना कमीत कमी ५ सामने जिंकावे लागणार आहेत.
राजस्थान रॉयल्स संघाला अनुभवी खेळाडू जोफ्रा आर्चर, जोस बटलर आणि बेन स्टोक्सची कमतरता भासणार आहे. हे तिघेही खेळाडू संघातील मुख्य खेळाडूंपैकी एक होते. परंतु वैयक्तिक कारणास्तव ही जबाबदारी डेविड मिलर आणि लियाम लिविंगस्टनवर आली आहे. या दोघांवर मध्यक्रमात मोठी धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये मुस्तफिजुर रहमानला महत्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. उर्वरित ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकणे या संघासाठी सोपे नसेल परंतु संघातील गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तर हा संघ नक्कीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतो.
अशी असेल राजस्थान रॉयल्स संघाची प्लेइंग इलव्हेन – संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), एविन लुईस, यशस्वी जयस्वाल/ मनन वोहरा, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवातिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकट, मुस्तफिजुर रहमान/ तबरेज शम्सी, चेतन सकारिया.
महत्त्वाच्या बातम्या-
वरुणच्या चक्रव्यूहात अडकली आरसीबी, तरीही कर्णधार कोहली खूश; म्हणाला, ‘टी२० विश्वचषकात…’
मन में लड्डू फुटा!! डगआऊटमध्ये आरसीबीच्या खेळाडूचं सुरू होतं भलतचं काही, फोटो भन्नाट व्हायरल